Maratha Reservation: रखरखत्या उन्हात जरांगे पाटलांचे आंदोलन, दुसरीकडे मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखला

पोलिसांनी समृद्धी महामार्ग मोकळा करण्याची विनंती मराठा आंदोलकांना केली. काही आंदोलकांना ताब्यात ही घेतलं गेलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उन्हात उपोषण सुरू केले आहे
  • जरांगे पाटील यांनी सरकारने प्रमाणपत्र न दिल्यास संबंधीत अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली
  • मराठा समाजाने जालन्यात समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक ठप्प केली होती
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
जालना:

मराठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं आपलं आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी आंदोलनाचं स्वरूप वेगळं आहे. पाटील हे त्यांच्या शेतात रखरखत्या उन्हात उपोषणाला बसले आहेत. मी उपोषणावर ठाम आहे असं जरांगे पाटील म्हणाले. 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र द्यावे, व्हॅलीडिटी द्यावी, सरकारने याबाबत आदेश काढावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.  व्हॅलिडीटी ,प्रमाणपत्र दिले नाही तर अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी ही त्यांनी केली. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं ही जरांगे यांनी स्पष्ट केलं. जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला होता. 
 
जरांगे पाटील पुढे म्हणाले की हैदराबाद गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश काढा. सातारा संस्थानचा जीआर काढा. सरकारने आता बहाणे करू नयेत. जीआर काढला तर त्याला आव्हान दिलं जाईल त्याला घाबरू नका असं ही ते म्हणाले. मराठ्यांच्या नशिबात चॅलेंज आहेच. मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे अधिकार गृह मंत्रालयाला आहेत. ते गुन्हे मागे घ्यावेत. त्याबरोबर  मराठा कुणबी मंत्रालय स्थापन करा अशी मागणी ही त्यांनी या निमित्ताने केली. आंदोल थांबणार नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. आता सरकारने ड्राफ्ट घेवूनच आपल्याकडे यावेळी असं ही ते म्हणाले. 

नक्की वाचा - Nashik News: 'आज तुम्हाला कापून टाकतो' मैत्री नाकारल्याचा राग, सहा मैत्रिणींचा विनयभंग, नाशिक हादरले

दरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीत उपोषणाला बसले असतानाचं दुसरीकडे मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालन्यातील नाव्हा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर मराठा समाजाच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला. काही वेळ समृद्धी महामार्ग रोखून धरण्यात आला होता. त्यामुळे इथं रस्त्यावर वाहनांच्या लांबच लाब रांगा लागलेल्या दिसत होत्या.  यावेळी पोलिसांनी समृद्धी महामार्ग मोकळा करण्याची विनंती मराठा आंदोलकांना केली. काही आंदोलकांना ताब्यात ही घेतलं गेलं.

Advertisement

नक्की वाचा - Big News: शाळकरी मुलींना मासिक पाळीची दरमहा 3 दिवसांची सुट्टी जाहीर, सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आले होते. त्यांनी शेतात जावून जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी आपली भूमीका मांडली. त्यांनी सांगितले की मराठ्यांना जात प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात करा, आंदोलनात गुन्हा दाखल केलेल्यांवर गुन्हे मागे घ्या, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशा मागण्या यावेळी त्यांनी विखे पाटील यांच्या समोर ठेवल्या.