Manoj Jarange : जरांगे पाटलांकडून नवं 'चॅलेंज'; सातारा-हैदराबाद गॅझेटच्या अभ्यासकांना आझाद मैदानावर बोलावले

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Update : मनोज जरांगे पाटील यांनी सातारा आणि हैदराबाद गॅझेटचा अभ्यास केलेल्या अभ्यासकांना खुले आवाहन केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Update : मनोज जरांगे पाटील यांनी नवं आव्हान दिलं आहे.
मुंबई:

विशाल पाटील, प्रतिनिधी 

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Update : मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षण द्यावं या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केलं आहे. आज (शनिवार, 30 ऑगस्ट) या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जरांगे पाटील यांनी सातारा आणि हैदराबाद गॅझेटचा अभ्यास केलेल्या अभ्यासकांना खुले आवाहन केले आहे. “उद्या सकाळी (रविवार 31 ऑगस्ट) 10 वाजता सर्व तज्ज्ञांनी येथे उपस्थित राहावे,” असं जरांगे पाटील यांनी म्हंटलं आहे.  

काय म्हणाले जरांगे?

मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले की, “मागील काही दिवसांत काही अभ्यासकांनी माझ्यासोबत एक बोलले, मात्र सरकारसमोर बसल्यावर अगदी वेगळ्याच भूमिका घेतल्या. या दुहेरी बोलण्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे उद्या जे खरोखर इतिहास व दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केलेले आहेत त्यांनी खुलेपणाने आपले मत मांडावे.”

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीमध्ये सातारा व हैदराबाद गॅझेटचा उल्लेख महत्त्वाचा ठरत आहे. या गॅझेटमधील नोंदींच्या आधारे मराठा समाज कुणबी असल्याचा दावा वारंवार केला जातो. मात्र या दस्तऐवजांचे खरे स्वरूप आणि त्याचे कायदेशीर महत्त्व यावर अद्यापही वाद आहेत. याच पार्श्वभूमीवर जरांगे यांनी थेट अभ्यासकांनाच आव्हान दिले आहे.

( नक्की वाचा : Manoj Jarange Patil : तोडगा नाही, चर्चा निष्फळ; मनोज जरांगे आणि सरकारी शिष्टमंडळात जोरदार वाद )
 

सरकार आणि आंदोलक यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत ऐतिहासिक कागदपत्रांचा उल्लेख वारंवार होत असल्याने अभ्यासकांची उपस्थिती निर्णायक ठरू शकते. जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, “समाजाला चुकीची माहिती मिळू नये. पारदर्शकपणे चर्चा व्हावी आणि योग्य दिशेने आंदोलन पुढे न्यावे, यासाठीच हे आवाहन करण्यात आले आहे.”

Advertisement

सध्या मराठा समाजात आरक्षणासंदर्भात मोठी चळवळ सुरू असून, ऐतिहासिक पुरावे व कागदपत्रांचा अभ्यास हा या संघर्षाचा गाभा ठरला आहे. आता उद्या होणाऱ्या या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे

सरकारी शिष्टमंडळासोबतची बैठक निष्पळ

दरम्यान,  आज (शनिवार, 30 ऑगस्ट ) राज्य सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी आणि माजी न्यायमूर्ती शिंदे यांचा समावेश होता. या बैठकीत दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्याने चर्चा अधिकच तापली.

Advertisement

( नक्की वाचा : मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाचे सर्व अपडेट वाचण्यासाठी इथे क्लिक करा )
 

Topics mentioned in this article