जाहिरात
27 minutes ago

Manoj Jarange Patil Maratha Reservation Protest Mumbai LIVE: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. मुंबईमधील आझाद मैदानावर जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे. दुसरीकडे राज्य सरकारकडून मनोज जरांगेंच्या उपोषणाची कोंडी सोडवण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. अनेक आमदार, खासदारांनाही उपोषणस्थळी भेट देत जरांगे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 

Maratha Reservation : मराठा आंदोलकांसाठी तात्पुरती प्रसाधनगृहे उभारण्यात आली

मराठा आंदोलकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेने 4 वैद्यकीय पथके आणि 2 रुग्णवाहिका आझाद मैदान परिसरात तैनात केल्या आहेत. याव्यतिरिक्त आंदोलकांसाठी तात्पुरती प्रसाधनगृहेही उभारण्यात आली आहेत, जेणेकरून स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग बंद पाडला

मराठा आंदोलकांनी समृद्धी महामार्ग बंद पाडला

छत्रपती संभाजीनगरमधील समृद्धी महामार्गाच्या जांबरगाव टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

समृद्धी महामार्गावर 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वैजापूर पोलीस घटनास्थळी दाखल

पोलिसांकडून मराठा आंदोलकांची समज काढण्याचा प्रयत्न सुरू

Amit Shah in Mumbai: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री शाहांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय गृहमंत्री शाहांच्या भेटीला

अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा 

Manoj Jarange Live Update : राज्याला अस्थिर करण्याचे काम सरकारमधील मंत्र्यांकडून होऊ नये- जरांगे

राज्याला अस्थिर करण्याचे काम सरकारमधील मंत्र्यांकडून होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचे आहे, आरक्षण द्यायचे नाही,' असा थेट आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Manoj Jarange Live Update : आम्ही दुसऱ्याचे काढून आम्हाला द्या, असे म्हणत नाही- मनोज जरांगे

गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा, त्यांचा अपमान करू नका. एकाचे आरक्षण काढून दुसऱ्याला देऊ शकत नाही. आम्ही दुसऱ्याचे काढून आम्हाला द्या, असे म्हणत नाही. त्यामुळे असा गैरसमज महाराष्ट्रात पसरवू नका, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. 

मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची बैठक

पुण्यात ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक 

मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाची बैठक

ओबीसी समाज बैठकीतून आंदोलनाची दिशा ठरवणार 

मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील आंदोलनानंतर ओबीसी आक्रमक 

 लक्ष्मण हाके, मंगेश ससानेंसह राज्यातील सर्व ओबीसी कार्यकर्ते बैठकीला येणार

राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरागे उपोषणाला बसले आहेत तर मराठा ओबीसीत घेण्यास ओबीसींचा विरोध आहे 

 सरकार मनोज जरांगे यांची झुंडशाही पुढे झुकत असल्याचा आरोप ओबीसी कार्यकर्त्यांनी केला आहे

 झुंडशाहीला झुंडशाहीने उत्तर द्यावं लागेल अशा प्रतिक्रिया ओबीसी बांधवांनी दिल्या आहेत यासाठी आंदोलनाची दिशा आज या बैठकीत ठरणार आहे

भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले, सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले

चार जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

देवदर्शनाला पायी जात असताना कंटेनरने चिरडले

नामलगाव फाट्यावर घडली घटना

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Wardha News : ट्युशनवरून परत येताना ट्रकमध्ये सापडल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

ट्युशनवरून परत येताना ट्रकमध्ये सापडल्याने झालेल्या अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू

वर्ध्याच्या रामनगर परीसरातील भगतसिंग चौकात घडली दुर्दैवी घटना

आरुष मांडवे वय 15 वर्ष असे मृतक विद्यार्थ्यांचे नाव

बेपत्ता तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह, जळगावातील घटना

 जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर येथील बेपत्ता तरुणाचा गावानजीक विहिरीत मृतदेह आढळला असून या घटनेमुळे फैजपुर शहरात खळबळ उडाली आहे. इस्माईल आलम शेख असे मृत तरुणाचे नाव असून गेल्या दोन दिवसापासून हा तरुण बेपत्ता असल्याने कुटुंबियांकडून तरुणाचा शोध घेतला जात होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता भुसावळ ट्रामा केअर सेंटर मध्ये हलवला आहे. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

बेपत्ता तरुणाचा विहिरीत सापडला मृतदेह, जळगावातील घटना

 जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या फैजपूर येथील बेपत्ता तरुणाचा गावानजीक विहिरीत मृतदेह आढळला असून या घटनेमुळे फैजपुर शहरात खळबळ उडाली आहे. इस्माईल आलम शेख असे मृत तरुणाचे नाव असून गेल्या दोन दिवसापासून हा तरुण बेपत्ता असल्याने कुटुंबियांकडून तरुणाचा शोध घेतला जात होता. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता भुसावळ ट्रामा केअर सेंटर मध्ये हलवला आहे. तरुणाच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.

मनोज जरांगेंच्या मागणीविरोधात ओबीसी महासंघाचा एल्गार

मनोज जरांगेंच्या मागणीविरोधात ओबीसी महासंघाचा एल्गार, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आजपासून नागपुरात साखळी उपोषण सुरु करणार

Listen to the latest songs, only on JioSaavn.com