देवा राखुंडे
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपल्या पक्षाचा मेळावा बारामतीत आयोजित केला होता. या मेळाव्याला पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यात छगन भुजबळ यांचाही समावेश होता. कार्यक्रमाला सुरूवात झाली. नेत्यांची भाषणे झाली. त्यानंतर मंत्री छगन भुजबळ हे भाषणासाठी उभे राहीले. त्यावेळी मेळाव्याला मोठ्या संख्येने मराठा समाजाची उपस्थिती होती. भुजबळ भाषणाला उभे राहीले आणि एकच गोंधळ मेळाव्यात पाहायला मिळाला. एक मराठा लाख मराठा अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. शिवाय ओबीसी मधून मराठा समजाला आरक्षण नको अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. त्या ऐवजी मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या अशीही त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाजामध्ये भुजबळांची प्रतिमा काहीशी वेगळी आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे भुजबळांवर कडवी टिका करतात. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आड जर कोणी असेल तर ते भुजबळ आहेत अशी भूमीकाही जरांगे पाटील यांनी मांडली आहे. त्यामुळे मराठा समाजात भुजबळांना टोकाचा विरोध पाहायला मिळत आहे.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? सत्तारांनी थेट नाव घेतले, किती जागा जिंकणार तेही सांगितले
त्याचीच प्रचेती बारामतीतल्या सभे वेळी भुजबळांना आली. भुजबळ राष्ट्रवादीच्या मंचावरून होते. ते भाषणाला उठले. त्यावेळी उपस्थित मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा मेळाव्यात घुमल्या. त्यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. नक्की करावे काय हेच त्यांना समजत नव्हते. अशा वेळी भुजबळांनीच आपलं भाषण आवरतं घेतलं. भुजबळ आपल्या जागेवर जावून बसले. त्यानंतर घोषणाबाजी थांबली. पण तेवढ्या वेळातही भुजबळांनी आपली बाजू मांडली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे ही माझी भूमिका आहे. पण ज्यांना आरक्षण मिळाले आहे त्यांच्या आरक्षणावर टाच येणार नाही याची काळजी घ्या असेही ते यावेळी म्हणाले. भाषणा वेळी त्यांच्या बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला सुनिल तटकरे उभे होते.