'माझी शुगर कशी वाढली? तुम्ही फडणवीसांना मॅनेज' जरांगेंनी डॉक्टरांना झापले

माझी तब्बेत चांगली आहे हे सरकारला दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? तुम्ही सरकारला खोटी माहिती पुरवत आहात असा आरोप मनोज जरांगे यांनी डॉक्टरांवर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
जालना:

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी इथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज शुक्रवारी चौथा दिवस आहे. या कालावधीत जरांगे पाटील यांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यात त्यांचा बीपी, शुगर तपासली जाते. चौथ्या दिवशी ही मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचे पथक आले होते. त्यावेळी जरागे यांची तपासणी करण्यात आली. त्यात त्यांची शुगर वाढत असल्याचे दिसून आले. त्यामुळे जरांगे डॉक्टरांवर भडकले. शिवाय त्यांना झाप झाप झापले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंतरवालीत जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. नेहमी प्रमाणे डॉक्टर त्यांची तपासणी करण्यासाठी तिथे पोहोचले. त्यावेळी जरांगे यांची शुगर 85 असल्याचे डॉक्टरांना आढळले. यावरून जरांगेंनी डॉक्टरांना एक ना अनेक प्रश्न केले. पहिल्या दिवशी शुगर ही 71 असताना उपोषणाच्या चौथ्या दिवशी 85 कशी? शुगर ही कमी व्हायला हवी होती ती वाढली कशी असा प्रश्न त्यांनी केला. माझी तब्बेत चांगली आहे हे सरकारला दाखवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का? तुम्ही सरकारला खोटी माहिती पुरवत आहात असा आरोपही त्यांनी यावेळी केला.    

ट्रेंडिंग बातमी - 'फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले' बड्या नेत्याचा बडा आरोप

 यावेळी मनोज जरांगे हे डॉक्टरांच्या पथकावर चांगलेच भडकले. तुम्ही असं कसं करू शकता. आम्ही इथे उपोषण करत आहोत. इथून कुठे हललो ही नाही. पोलीस पाहाऱ्याला आहेत. आमची माणसं इथं बसली आहेत. अशा मी ही कुठे गेलो नाही. तरी माझी शुगर कशी वाढली असा जाब त्यांनी विचारला. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना मॅनेज झाला आहात असा थेट आरोपही यावेळी जरांगे यांनी केला. तुम्हा असं करून काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहात असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने केला. 

ट्रेंडिंग बातमी - मविआत पुढचा मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने थेट सांगितलं, आघाडीत बिघाडी होणार?

मराठा समाजाला आरक्षण मिळाले. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी मनोज जरांगे यांची आहे. शिवाय मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिले जावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देवू नये. त्यांना वेगळे आरक्षण द्यावे असे ओबीसी समाजाचे म्हणणे आहे. त्यामुळेच जरांगे यांच्या उपोषणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपले उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे आरक्षणावरून राज्यात वातावरण तापले आहे.