
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हाफ्ता जून महिना उजाडला तरी लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहीणींचे हाफ्ता कधी जमा होणार याकडे लक्ष लागले होते. निवडणूकीच्या आधी वेळीत पैसे जमा करणाऱ्या सरकाने निवडणूकीनंतर हा हाफ्ता कधी ही वेळत जमा केला नाही. मे महिना संपला तरी त्याचा हाफ्ता अजून ही जमा झाला नव्हता. आता हे पैसे कधी जमा होणार आहेत हे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनचा मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचं आदिती यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून म्हणजे 4 जूनला सुरू करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून म्हणजेच 5 जूनला हा सन्मान निधी जमा होणार आहे असं ही त्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू !
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 4, 2025
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या…
महायुती सरकारचा दृढ निश्चय आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार आहे. असा विश्वास ही आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आत मे महिन्याचा हाफ्ता जूनच्या 5 तारखेला मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा हाफ्ता देण्यास निवडणूकीनंतर उशीर होत आहे. त्यामुळे महिलांना वारंवार बँकेत जावून पैसे जमा झाले आहेत की नाही हे पाहालं लागत आहे. अनेक वेळा पैसे जमा झालेले नसतात त्यामुळे त्यांचा हिरमोड होतो. शिवाय एक एक महिना उशिराने पैसे जमा होत आहे. त्यात या योजने मुळे सरकारवर ही मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडला आहे. विकास कामाना पैसे मिळत नाहीत असा ओरड आता महायुतीमधील आमदारच करत असताना दिसत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world