मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मुंबईतल्या एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. राजकीय वर्तूळात या भेटीचे वेगवेगळे अर्थही लावले जात आहेत. दोन्ही नेते या हॉटेलमध्ये तब्बल तीन तासापेक्षा जास्त वेळी उपस्थित होते. मात्र ही भेटी झाली की नाही याबाबचा खुलासा आता देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे मंत्री गिरीष महाजन यांनीच केले आहे. शिवाय शिवसेना ठाकरे गटाबाबत त्यांनी एक मोठे विधान ही केले आहे. ते पंढरपूरला आले होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर त्यांनी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत गिरीष महाजन यांनी विचारण्यात आलं. त्यावर बोलताना महाजन म्हणाले की फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची कुठल्याही प्रकारची भेट हॉटेलमध्ये झाली नाही. ते त्या हॉटेलमध्ये होते. पण ते दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. असे स्पष्टीकरण महाजन यांनी दिले आहे. त्यामुळे अशी कोणतीही भेट झाली नाही. किंवा कोणतीही राजकीय चर्चाही झाली नाही असं त्यांनी सांगितंल. भेटी बाबत अफवा असल्याचं ते म्हणाले. शिवाय यासर्व चर्चांवर त्यांनी पुर्ण विराम ही दिला आहे.
नक्की वाचा - Viral video:' मराठी येत नाही तर बाहेर निघ', लोकलमध्ये महिलांच्या डब्यात जोरदार राडा
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड संपला असं ही ते यावेळी म्हणाले. भाजपला सोडून शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली, तेव्हाही ठाकरे ब्रँड संपला, अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवला आहे. तसेच उबाठातील खासदार मनाने भाजपसोबत असल्याचा दावाही गिरीश महाजन यांनी केला. मंत्री गिरीश महाजन हे आज पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत लोक आज गमतीने पाहत आहेत असा टोलाही त्यांनी लगावला. तुम्हीच प्रश्नपत्रिका काढायची तुम्हीच उत्तर पत्रिका काढायची आणि मुलाखत घ्यायची. हा सगळा मॅनेज शो आहे, असे म्हणत राऊत आणि ठाकरे यांच्या मुलाखतीवरही मिश्किल टिपणी महाजन यांनी केली. राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत, असे संजय राऊत म्हणतात. कदाचित संजय राऊत सध्या भाजपच्या वरच्या गोटातले झाले असावेत. ज्या फेरबदलाची कल्पना मुख्यमंत्र्यांना माहिती नाही. ते कदाचित संजय राऊत यांना पक्षश्रेष्ठीकडून दिल्लीतून कळले असावे असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच विधिमंडळामध्ये बसून रमी खेळण्याचे कोणी समर्थन करणार नाही. हे अयोग्यच आहे. असेही मंत्री महाजन यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल व्हिडिओ बद्दल प्रतिक्रिया देताना बोलले.