Miraroad News: मनसे विरोधात व्यापारी रस्त्यावर, मीरा-भाईंदरमध्ये बंद, भाजपवर मोठा आरोप

या प्रकरणामुळे मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मीरारोड:

मनोज सातवी

मीरा-भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांनी बाबुलाल नावाच्या दुकानदाराला चोप दिला होता. त्यानंतर त्याचे पडसाद शहरात उमटताना दिसत आहेत.  शहरातील व्यापारी संघटना मनसे विरोधात आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेकडून शहरात बंदची हाक देण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी काळ्या फिती बांधून सिरवी हॉलमध्ये मनसेच्या विरोधात निषेध व्यक्त केला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र, व्यापारी संघटनेकडून दिलेल्या या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही ठिकाणी दुकाने बंद होती, तर काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली होती. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांचा बंद भाजप पुरस्कृत होता. हिंदी सक्तीचा शासन निर्णय (GR) रद्द करण्याची नामुष्की आल्यामुळे भाजपचा तीळपापड झाला आहे. त्यामुळेच भाजप अशा प्रकारचे वाद निर्माण करत असून, मनसेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.” असं अविनाश जाधव म्हणाले आहेत.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Double Murder: मालकीण रागावली म्हणून संतापलेल्या नोकारनं केली माय-लेकराची गळे चिरुन हत्या!

या प्रकरणामुळे मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, आणि स्थानिक राजकीय वातावरणात तापल्याचे चित्र आहे. यात आता स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी ही भूमीका स्पष्ट केली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेले आरोप त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. मिरा भाईंदरमध्ये सर्व जाती धर्माचे लोकं राहतात. ते शहर शांतीप्रिय आहे. तिथेट मराठीत बोलला नाही म्हणून मारहाण केली. त्या विरोधात आम्ही एफआयआर करायला लावली. अशा पद्धतीची मारहाण खपवून घेणार नाही असा इशाराही मेहता यांनी यावेळी दिला. मनसेच्या या कृतीचा  आम्ही निषेध व्यक्त करतो असं ही ते म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Crime News: सासऱ्याचा गळा कापला, सासूलाही ठार केलं, पत्नी समोरच थरकाप उडवणारा डबल मर्डर

मनसेची दादागिरी खपवून घेणार नाही असं ही आमदार मेहता म्हणाले. अविनाश जाधव यांनी आरोप केले की भाजपने हे केले आहे. मात्र व्यापारी लोकांनी स्वत: समोर येत हा मोर्चा काढला असल्याचं ते म्हणाले. मराठीवर आमचा अभिमान आहे. आमचा मोर्चा असता तर समोरुन काढला असता. माझा त्या व्यापाऱ्यांना पाठिंबाच आहे असं ही आमदार मेहता यावेळी म्हणाले. एखाद्याकडून चूक होत असेल तर कोर्टात जा, पोलिसांकडे जा मात्र मारहाण करणं चुकीचं आहे असं ही ते म्हणाले. त्यामुळे हा मुद्दा आता आणखी तापण्याची शक्यता आहे. व्यापारी रस्त्यावर आल्यानंतर आता मनसे काय भूमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Advertisement