Prakash Solanke: 'मी विधानसभा निवडणुकीत 10 ते 12 कोटी खर्च केले', दादांचा आणखी एक आमदार अडचणीत?

निवडणूक आली की कोणी ही येतं आणि निवडणुकीत उभं राहतं. कुणी ही येतो आणि पैशाच्या जोरावर निवडणुका लढवतो, असं सोळंके म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
बीड:

विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. त्यानुसार उमेदवाराल खर्च करावा लागतो. विधानसभेसाठी ही मर्यादा 40 लाखांची आहे. असं असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट आमदार प्रकाश सोळंके यांनी आपण निवडणुकीत 10 ते 12 कोटी खर्च केल्याचे जाहीर पणे सांगितले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.  त्यांनी मर्यादे पेक्षा जास्त खर्च केल्याचेच कबूल केले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.    

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माजलगाव मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र याच व्हिडिओमुळे सोळंके अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आधी संदीप क्षीरसागर यांचा नायब तहसीलदारांना केलेला फोन कॉल वायरल झाला. आता आमदार सोळंके यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते निवडणुकीत आपण किती खर्च केला आणि समोरच्या उमेदवाराने किती खर्च केला याचा हिशोब मांडताना दिसत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - UP News : लग्नानंतर पहिल्याच रात्री नवरा-नवरीसोबत भयंकर घडलं; सकाळी बेडरुममधील दृश्य पाहून सगळेच हादरले

निवडणूक आली की कोणी ही येतं आणि निवडणुकीत उभं राहतं. कुणी ही येतो आणि पैशाच्या जोरावर निवडणुका लढवतो. अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे, असं सोळंके सांगतात. पुढे ते म्हणतात की, मी ऐकलं की माजलगाव विधानसभा मतदारसंघात एका उमेदवाराने निवडणुकीमध्ये 45 कोटी रुपये खर्च केले. असे लोक बोलतात. मला काही माहित नाही. दुसऱ्या एका उमेदवाराने तर 35 कोटी रुपये खर्च केले, असे लोक सांगतात. मी आपले फक्त 10-12 कोटी रुपये खर्च केले आणि निवडणुकीत जिंकलो,असं सांगताना दिसत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात नेमकं चाललंय काय? मसाज करण्याच्या बहाण्याने महिलेला टॉप काढायला लावला अन्...

राजकारणामध्ये सर्वसामांन्याचे काम करणं महत्त्वाचे आहे. पैसे दुय्यम आहेत.असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी वडवणी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी रविवारी केले आहे. गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते यांचे व्हिडिओ व्हायरल होत असताना आता लोकप्रतिनिधींचेच व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग वायरल होताना दिसत आहेत. विधानसभा निवडणुकीत उमेदवाराला खर्च करण्याची मर्यादा 40 लाख रुपये असते. तर लोकसभेच्या निवडणुकीत ती मर्यादा 75 लाख रुपये असते. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Crime News: 3 लेकरांची आई, 3 महिन्याच्या भाच्याला घेऊन पळाली, प्रियकराला भेटली, पुढे जे समोर आलं ते...

अशा स्थितीत प्रकाश सोळंके यांनी आपण मात्र कोट्यवधी रुपये खर्च केल्याची कबूली दिली आहे. यावरून त्यांना आता विरोधकांनीही घेरलं आहे. त्यानंतर सोळंके यांनी आपण हे चेष्टेने बोललो अशी सारवा सारव केली आहे. पण विरोधक त्यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. अशा स्थितीत आता निवडणूक आयोग सोळंकेंचे हे वक्तव्य किती गांभिर्याने घेतं आणि कारवाई करतं की नाही याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.