
एकामागून एक पुण्यात होणाऱ्या घटना पाहाता पुण्यात नक्की चाललंय तरी काय अशा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. विद्येचे माहेरघर अशी पुण्याची ओळख आहे. पण गेल्या काही काळात पुण्यात घडत असलेल्या घटना पाहाता ही ओळख पुसली जाते की काय अशी भिती निर्माण झाली आहे. त्यात आता आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. इथं एका आयुर्वेदिक उपचार केंद्रात भलताच प्रकार झाल्याचे समोर आले आहे. काही टपोरींनी इथं काम करणाऱ्या महिलांना धमकावलचं नाही तर नको त्या गोष्टी ही करायला भाग पाडल्या. या मुळे एकच खळबळ उडाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यातील धनकवडी भागात एक आयुर्वेदिक उपचार केंद्र आहे. या केंद्रावर उपचार घेण्यासाठी दोघे जण आले होते. तिथे मसाज करण्यासाठी महिला होत्या. आपल्याला तिळाच्या तेलाने मसाज करायचा आहे असं त्यांनी सांगितलं. मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. मी सांगेन तसं केलं नाही तर तुमचं उपचार केंद्र बंद करेन अशी धमकी ही त्यांनी दिली. त्यानंतर मसाज करणाऱ्या महिलेला तिचा टॉप काढून मसाज करायला भाग पाडले. मसाज करत असताना त्यांनी त्या महिलांचे व्हिडीओ ही काढले.
त्यानंतर तिथे आणखी दोघे जण आले. आताच्या आता आम्हाला 20,000 हजार रुपये द्या अशी मागणी केली. नाही दिले तर मसाज करतानाचे व्हिडीओ आम्ही व्हायरल करू अशी धमकी दिली. त्यावेळी त्या उपचार केंद्रावर तेवढे पैसे नव्हते. मग त्या लोकांनी गल्ल्यात असलेले 800 रुपये घेवून तिथून पळ काढला. त्यानंतर याबाबतची तक्रार पोलीसात दाखल करण्यात आली. मात्र सीसीटीव्ही नसल्याने आरोपींची कोणतीही माहिती मिळत नव्हती. अशा स्थितीत तपास करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे या आरोपींची माहिती काढली. त्यानुसार रोहित वाघमारे, शुभम धनवटे, राहुल वाघमारे यांना अटक करण्यात आली आहे. या आधी ही त्यांच्यावर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. आयुर्वेदिक उपचार केंद्रांवरील महिलांचे व्हिडिओ काढून ब्लॅकमेलिंग करणारी ही टोळी आहे. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world