कार्यकर्ता आणि नेता यांचे एक वेगळचं नातं असतं. तेवढ्या विश्वासाचं आणि प्रेमाचं हे नातं असतं. या प्रेमापोटी कार्यकर्ते काही करण्यास तयार असतात. अशा कार्यकर्त्यांची नेतेही खास काळजी घेतात. एक असा कार्यकर्ता आहे ज्याने आपला नेता जोपर्यंत विधानसभेवर निवडून जात नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा पण केला होता. तो पण पुर्ण होण्यासाठी त्याला सहा वर्ष वाट पाहावी लागली. जेव्हा त्याची माहिती नेत्याला समजली तेव्हा नेत्यानेही मोठ्या मनाने या कार्यकर्त्याची भेट घेतली. त्याला स्वत:च्या हाताने चप्पल ही घातली. ही घटना घडली आहे बीड जिल्ह्यातील आष्ठी तालुक्यात.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माऊली बांदल हा बीड जिल्ह्यातील आष्टीचा रहावासी. तो राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. भाजप नेते सुरेश धस यांचा तो कार्यकर्ता आहे. सुरेश धस यांच्यासाठी त्याने सुरूवातीपासूनच जिवाचे रान केले आहे. याच आष्टी मतदार संघातून धस यांचा पराभव झाला होता. त्यावेळी याच माऊली बांगल यांने शपथ घेतली होती. याच मतदार संघातून जोपर्यंत सुरेश धस हे आमदार होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही. 2018 साली त्याने ही शपथ घेतली होती.
ही शपथ पूर्ण होण्यासाठी त्याला 2024 ची वाट पहावी लागली. सुरेश धस हे राजकारणात सक्रीय होते. त्यांना आष्टी मतदार संघातून उमेदवारीही मिळाली होती. पण जिंकण्यासाठी त्यांच्या समोर तगडे आव्हान होते. स्वकियां बरोबरच महायुतीतले मित्र ही विरोधात उभे ठाकले होते. शिवाय विरोधतांचे आव्हान तर होतेच. अशा वेळी विजय मिळेल की नाही याची शास्वती नव्हती. पण त्यांनी तगडी झुंज दिली. मेहनत घेतली. शेवटी आष्टी मतदार संघातून त्यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित करत विजय मिळवला.
याचा सर्वात जास्त आनंद हा माऊली बांदल याला झाला. बांदल याने असा पण केला होता याची माहिती याच वेळी सुरेश धस यांना मिळाली. त्यांनी कसला ही विचार केला नाही. त्यांनी थेट आपला कार्यकर्ता असलेल्या बांदलचं घर गाठलं. त्यानंतर आमदार धस यांनी स्वत:च्या हाताने बांदलच्या पायात चप्पल घातली. कार्यकर्त्यांना आकाश ठेंगणं झालं. कार्यकर्ताही आपल्या नेत्या बाबत भरभरून बोलला. सर्व सामान्यातलं हे नेतृत्व असल्याचं ते म्हणाले. कार्यकर्त्याची काळजी करणारे हे नेतृत्व असल्याचंही या निमित्ताने बांदल म्हणाले.