NOTA Votes In Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीत 'यापैकी कोणीही नाही'(NOTA) बटण दाबणाऱ्यांची संख्या मागील निवडणुकींच्या तुलनेत वाढली आहे. पण तरीही 2015 च्या तुलनेत खूपच कमी आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 6 आणि 11 नोव्हेंबरला दोन टप्प्यांत झालेल्या निवडणुकीनंतर शुक्रवारी मतमोजणी झाली. राजग बिहार निवडणुकीत प्रचंड बहुमताकडे वाटचाल करत आहे आणि एकूण 243 जागांपैकी जागांपैकी सुमारे 200 जागांवर आघाडीवर आहे.भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे.
एकूण किती मतदारांनी नोटा बटण दाबले?
"राजद,काँग्रेस आणि तीन डाव्या पक्षांची महाआघाडी 35जागांचा आकडा पार करण्यासाठी संघर्ष करत आहे. ताज्या आकडेवारीनुसार,मतदानादरम्यान एकूण मतदारांपैकी 1.1 टक्के म्हणजेच 6,65,870 जणांनी नोटा बटण दाबले. बिहारमध्ये 7.45 कोटींपेक्षा जास्त मतदार आहे. वर्ष 2020 मध्ये जवळपास 7,06,252 लोकांनी विधानसभा निवडणुकीत NOTA बटण दाबले होते. जे एकूण टाकलेल्या मतांच्या 1.68 टक्के होते. वर्ष 2015 मध्ये NOTA दाबणाऱ्यांची संख्या 9.4 लाख होती. जी मतदान करणाऱ्या एकूण 3.8 मतदारांपैकी 2.48 टक्के होती.
नक्की वाचा >> Bihar Assembly Election 2025: बिहारमध्ये NDA चं डबल इंजिन सुसाट, 'ही' आहेत विजयामागची सर्वात महत्त्वाची कारणे
एनडीएने बिहारमध्ये मोठा विजय मिळवला, 200 पेक्षा जास्त..
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ने बिहारमध्ये भव्य विजय मिळवला आहे.एनडीएने 200 पेक्षा जास्त जिंकून शानदार पुनरागमन केले आहे.तर आरजेडी, काँग्रेस आणि इतर पक्षांची महाआघाडी 40 जागांचा आकडाही पार करू शकले नाही. भाजपाचा स्ट्राइक रेट जिथे 90 पेक्षा जास्त राहिला. तिथे जेडीयूने मागील वेळेपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या.विश्लेषकांनी या निकालाबाबत अनेक कारणे मांडली आहेत. एनडीएने अशा 80 टक्के जागा जिंकल्या आहेत जिथे मतदान मागील निवडणुकीपेक्षा 10 टक्के अधिक झाले आहे. तर महाआघाडीने अशा 19 जागांवर विजय मिळवला आहे. यामध्ये आरजेडी 14 आणि काँग्रेस 8जागांवर सर्वात पुढे राहिली.