Bihar Vidhansabha Election 2025 Result : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत एनडीएनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. आज दुपारी 3.30 बिहार विधानसभा निवडणुकीच्या एकूण 243 जागांपैकी 206 जागांवर एनडीए आघाडीवर आहे. तर महाआघाडीला 30 जागांवर आघाडीवर आहे. इतर पक्ष 7 जागांवर आघाडीवर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, या विजयामागे फक्त मोठी आश्वासने नाहीत, तर अनेक छोट्या-मोठ्या रणनीतींनी काम केलं आहे. एनडीएचा विजय हा केवळ योगायोग नाही, तर मोठ्या राजकीय मोर्चेबांधणीचा हा परिणाम आहे. एनडीएला या निवडणुकीत घवघवीत यश कसं मिळालं? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
1) पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अन्..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे एनडीएला सत्ताविरोधी लाटेच्या दबावातून बचाव मिळाला. त्यांनी निवडणुकीला ‘केंद्राची हमी विरुद्ध राज्यातील अस्थिरता' या चौकटीत यशस्वीपणे बसवले. या “डबल इंजिन”च्या अपीलमुळे मतदारांच्या मनात हा विश्वास दृढ झाला की विकास आणि स्थैर्यासाठी केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असणे आवश्यक आहे.
2) एनडीएच्या ‘कुशल नेतृत्वावर' शिक्कामोर्तब
एनडीएने निवडणुकीच्या खूप आधीच नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. स्वतः पंतप्रधानांनी सुरुवातीच्या प्रचारसभांमध्ये नीतीश यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले.
नक्की वाचा > Viral Video: ताजमहालचा 'हा' भाग आजपर्यंत कोणीच पाहिला नाही! एकाने गुपचूप काढला व्हिडीओ, 'ते' सत्य आलं समोर!
3) योग्य वेळी उमेदवारांची घोषणा
एनडीएने आपली तिकीट वाटप प्रक्रिया वेळेत आणि संघटित पद्धतीने पूर्ण केली, ज्यामुळे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला. जनतेतही सकारात्मक संदेश गेला. तिकीट वाटपात जातीय संतुलनाचे पूर्ण भान ठेवले गेले. एनडीएमध्ये ‘चिरागचं पुनरागमन आणि वेळेचे व्यवस्थापन' करण्यात आलं. चिराग पासवान यांना आघाडीत सामील करण्याची प्रक्रिया जरी लांबली, तरी एनडीएने ती निवडणुकीच्या घोषणेपूर्वीच अंतिम केली. यावरून दिसते की एनडीए नेतृत्वाने आपली सर्वात मोठी आव्हानेही वेळेत ‘मॅनेज' केली आणि प्रचार सुरू होण्यापूर्वीच आघाडीचं चित्र स्पष्ट केलं.
4) ‘जीविका दीदी' महत्त्वाचं घटक
‘जीविका दीदी' फक्त स्वतः मतदान करत नाहीत, तर आपल्या गटाला, कुटुंबाला आणि शेजाऱ्यांनाही मतदानासाठी प्रेरित करतात. एकूणच निकाल सांगतात की हा ‘सायलेंट वोट'च होता ज्याने अनेक जवळच्या जागांवर निकाल एनडीएच्या बाजूने वळवला.
नक्की वाचा >> Video: हाताने कुकर उघडलं नाही, महिलेनं लावला दिमाग! केलं असं काही..सोशल मीडियावर बायकांनी केलं भरभरून कौतुक!
5) महाआघाडीत‘सीट वाटपासाठी रस्सीखेंच आणि विलंब
महागठबंधनमध्ये जागा वाटपासाठी मोठी रस्सीखेंच सुरु होती. तसंच उमेदवार जाहीर करण्यात विलंबही लागला होता. यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. तसच आघाडीत अंतर्गत मदभेद असल्याचंही समोर आलं. अनेक जागांवर नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली. ज्याचा थेट फायदा एनडीएच्या उमेदवारांना झाला.
6) महाआघाडीत जागावाटपाची रस्सीखेच
महाआघाडीत जागा वाटपासाठी मोठी रस्सीखेंच सुरु होती. तसंच उमेदवार जाहीर करण्यात विलंबही लागला होता. यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं. तसच आघाडीत अंतर्गत मदभेद असल्याचंही समोर आलं. अनेक जागांवर नाराज उमेदवारांनी बंडखोरी केली. ज्याचा थेट फायदा एनडीएच्या उमेदवारांना झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world