'महायुतीत सात मुख्यमंत्री' संजय राऊतांनी धडाधड नावं घेतली

महायुतीत कशी रस्सीखेच सुरू आहे याचा पाढाच संजय राऊत यांनी वाचला. शिवाय अमित शहांच्या मनात काय आहे? त्यांना कोणाला हटवायचे आहे आणि कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे याचा गौप्यस्फोट ही केला.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

महायुतीमध्ये एक दोन नाही तर सात मुख्यमंत्री असल्याची खोचक टिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हे सात मुख्यमंत्री कोण याची नावेही राऊत यांनी घेतली. शिवाय महायुतीत कशी रस्सीखेच सुरू आहे याचा पाढाच त्यांनी वाचला. शिवाय अमित शहांच्या मनात काय आहे? त्यांना कोणाला हटवायचे आहे आणि कोणाला मुख्यमंत्री करायचे आहे याचा गौप्यस्फोट ही केला. भाजपच्या कोअर कमिटी मिटींगमध्ये काय ठरलं त्याची आतली बातमीही त्यांनी यानिमित्ताने दिली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण यावर एकमत नाही. सध्या महायुतीत सात मुख्यमंत्री आहेत. त्यात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा समावेश आहे. शिवाय केंद्रात काम करत असलेले दोन जणही वेटींगवर आहेत. शिवाय महाराष्ट्रातील फडणवीसांचे विरोधक समजले जाणारे दोन नेतेही मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहात आहेत. असे संजय राऊत म्हणाले. त्यामुळे महायुतीत रस्सीखेच आणि गोंधळ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.  

ट्रेंडिंग बातमी - कोणी- कोणी बनवला आहे अर्थसंकल्प, अर्थमंत्री सीतारमण यांच्या टिममध्ये 'हे' आहेत मुख्य चेहरे
  
भाजपच्या कोअर कमिटीमध्ये शिंदेंना घालवायचं आहे असा निर्णय झाला आहे. त्यांना आता भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे असा दावाही संजय राऊत यांनी केला. अमित शहा म्हणाले होते की शिंदेच 2024 नंतर मुख्यमंत्री राहतील. पण शहा यांच्या शब्दावर विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळेच कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचा मुख्यमंत्री करण्याचे ठरले आहे असे राऊत म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री म्हणून अमित शहा यांच्या मनात देवेंद्र फडणवीस नक्कीच नाहीत. त्यांच्या ऐवजी एक वेगळे नाव पुढे येईल असेही राऊत म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे गटाला 'जोर का झटका'

या सर्व गोंधळामुळे महायुतीचे नेतेच परस्पराचे पतन करणार आहेत. एकमेकाचा उमेदवार तेच पाडणार आहेत. सध्या एकत्र राहणे ही त्यांची मजबूरी आहे. त्यामुळे हे सर्व जण एकत्र आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीनंतरचे चित्र हे वेगळे असेल. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टिका केली. अबू आझमी यांचे मत शिंदेंना विधान परिषद निवडणुकीत कसे चालले असा प्रश्न त्यांनी शिंदेंना केला.  

Advertisement