गुणरत्न सदावर्ते हे आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. सदावर्ते आणि वाद हे जणू एक समिकरण झाले आहे. सध्या सदावर्ते हे बिग बॉसमध्ये स्पर्धक आहेत. यावेळी त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यात त्यांनी दाऊच्या धमकीच्या फोन पासून ते स्वत: च्या एन्काऊंटर पर्यंत ते अगदी जेलमध्ये भेटलेल्या आरएसएसच्या डॉक्टरपर्यंतचे धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांच्या या धक्कादायक विधानांमुळे राजकीय वातावरण तापण्याची दाट शक्यता आहे. शिवाय त्यांची ही विधान खळबळ उडवून देणारीच आहेत. त्यामुळे वाद ही निर्माण होवू शकतो.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
गुणरत्न सदावर्ते हे सध्या बिग बॉसच्या घरात आहे. घरात आल्यापासून पहिल्या दिवसापासून त्यांनी घरात आपली पकड बनवली आहे. त्यांनी त्याता आता एक खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात आपला खंडाळ्याच्या घाटात एन्काऊंटर केला जाणार होता. असं धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता. त्यावेळी शरद पवारांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सदावर्ते यांना अटक झाली होती. त्या वेळी खंडाळा घाटात पोलिसांना माझा एन्काऊंटर करायचा होता असा आरोपही त्यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - प्रहारचे राजकुमार पटेल शिंदेंच्या सेनेत कसे गेले? मोठा गौप्यस्फोट
अटक झाल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रमध्ये जशी तीर्थ यात्रा होते, तशी माझी जेल यात्रा झाली होती असे ही ते म्हणाले. अटकेत असताना काही कारण नसतानाही आपल्याला सलाईन लावली होती. त्यावेळी जेलमध्ये एक आर. एस. एस. चे डॉक्टर आपल्याला भेटले होते. त्यांनीच आपले प्राणा वाचवले असा दावा सदावर्ते यांनी केला आहे. त्यावेळी पोलिसां बरोबर आपण गेलो असतो तर त्याच वेळी एन्काऊंटर झाले असते असेही ते म्हणाले.
जेल मध्ये आपल्याला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते. या अंडा सेलमध्ये कसाब होता. त्याच ठिकाणी आपण होते असेही ते म्हणाले. त्या वेळी एक अधिकारी म्हणाला होता की जर तुमचा ताबा आम्हाला मिळाला असता तर तुमचा खंडाळा घाटात एन्काऊंटर होणार होता. दरम्यान ठाकरे आणि पवारांचे सरकार खाली खेचण्यासाठी सहा महिने मेहनत घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सरकार आले. त्यांना आमदार मिळवून दिले असा दावाही त्यांनी यातून केला.
बिग बॉसमध्ये येण्या आधी आपल्याला धमकीचे फोन आले होते. हे फोन दुसरे तिसरे कोणाचे नाही तर दाऊदचे होते असा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला आहे. हे फोन कराचीवरून आले होते असेही त्यांनी सांगितले. आपण त्याच्या विरूद्ध काही केसेस लढत असल्याने हे फोन येत असल्याचेही सदावर्ते यांनी सांगितले आहे. आता सदावर्ते यांनी केलेल्या या धक्कादायक वक्तव्यामुळे त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटण्याची शक्यता आहे.