Political news: 'अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, त्यांची युती धर्माची माहिती कमी' शिंदेंच्या शिलेदार थेट भिडला

अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत उमटताना दिसत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
नांदेड:

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या  निवडणुका  स्वबळावर  लढवण्याचे संकेत खासदार अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे नांदेड जिल्ह्यात महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी चव्हाणांना प्रत्युत्तर देत अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही असा थेट पलटवारच त्यांच्यावर केला आहे. शिवाय ही बाबात आपण थेट देवेंद्र फडणवीसांच्या कानावर घालू असं म्हणत नांदेडमध्ये आता चव्हाणांचं एकतर्फी काही चालणार नाही याचेच संकेत दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अशोक चव्हाणांच्या स्वबळानंतर आता शिवसेना शिंदे गटाने ही स्वबळाची भाषा सुरू केली आहे. त्यांचे स्वबळ असेल तर आमचे पण स्वबळ आहेच. असं वक्तव्य आमदार हेमंत पाटील यांनी केले आहे. शिवाय अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही.  अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहेत. अशी टीका ही शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केली. नांदेडमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी युती धर्म काय असतो हे ही चव्हाण यांना सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

चव्हाण हे भाजपमध्ये नव्याने आले आहेत. त्यामुळे त्यांना युती धर्माबाबत कमी माहिती आहे. पण भाजप आणि शिवसेनेची जुनी युती आहे. नांदेड जिल्ह्यातल्या भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांना कार्यकर्त्यांना युती धर्म काय असतो हे माहित आहे. आम्ही त्यांच्या हातात हात घालून काम केलं आहे. जिल्ह्यातील भाजपचे नेते चैतन्य देशमुख, प्रविण साली यांची नावेही या निमित्ताने हेमंत पाटील यांनी घेतली. 

ट्रेंडिंग बातमी - KDMC की भ्रष्टाचाराचा बाजार? दीड लाखाची लाच घेताना लिपीक गळाला, 2 बडे अधिकारीही अडकणार

अशोक चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद महायुतीत उमटताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गट याबाबत भलताच आक्रमक झाला आहे. त्यामुळे त्यांनी आतापासूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांचे मेळावे घेणे सुरू केले आहे. शिवसैनिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करावी असे आदेशही देण्यात आले आहेत.   

Advertisement