- भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका.
- TMC आमदार हूमायू कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची भूमिपूजन करण्याचं जाहीर केलं आहे.
- नवनीत राणा यांनी ममता बॅनर्जी यांना राम नाम जपण्याचा सल्ला दिला आहे.
भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रखर हिंदूत्वाचा स्विकार केला आहे. एक कडवट हिंदू नेता म्हणून त्या आपली प्रतिमा तयार करत आहे. त्यासाठी पक्षाकडून ही त्यांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळेच त्यांना हैदराबादमध्ये ओवेसी यांच्या गडात पक्षाने प्रचारासाठी धाडले होते. हनुमान चालीसाचं प्रकरण तर सर्वांनीच पाहीले होते. आता त्या थेट पश्चिम बंगालमध्ये जावून ममता बॅनर्जींनाच चॅलेंज करणार आहे. याबाबतचे त्यांचे एक ट्वीट सध्या जबरदस्त चर्चेत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या नवनीत राणा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर आणि त्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षावर (TMC) थेट टिका केली आहे. TMC चे आमदार हूमायू कबीर यांनी 6 डिसेंबर रोजी आम्ही बाबरी मशिदीचे भूमीपूजन करणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. ही बाबरी मस्जिद मुर्शीदाबाद इथं उभारली जाणार आहे. त्यांनी हे विधान केल्यानंतर हा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. विशेष म्हणजे त्या आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ही मुर्शीदाबादमध्ये जाणार आहेत.
TMC आमदाराच्या वक्तव्यावर पलटवार करताना नवनीत राणा यांनी अत्यंत कठोर शब्दांत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्या म्हणाल्या, "बाबर आणि त्याचे वंशज या देशात कधीही जन्माला येणार नाहीत." राणा यांनी थेट ममता बॅनर्जी यांना सल्ला दिला की, "ममता दीदींनी आता राम नामचा जप सुरू करावा. अन्यथा, त्यांनी महाराष्ट्रात येऊन येथील विरोधकांची काय अवस्था झाली आहे, ते पाहावे." राणा यांचा हा इशारा महाराष्ट्रातील अलिकडच्या राजकीय उलथापालथीकडे होता. पुढे त्या म्हणाल्या की बंगालला बांगलादेश होवू देणार नाही. बाबरीच्या नावाने एक जरी वीट लावली गेली तर बंगालमध्ये येवून ती फेकून देईन असा इशारा त्यांनी दिला आहे.
राजकारणातील तिकीट वाटपाबद्दल बोलताना राणा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. "तुम्ही म्हणता की काँग्रेसने मुस्लिमांना तिकीट दिले. आम्ही कधी म्हटले की काँग्रेसने आमच्या लोकांना तिकीट दिले? काँग्रेस त्याच लोकांना तिकीट देईल ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे. याउलट, भाजप त्याच उमेदवारांना संधी देईल, जे प्रखर रामभक्त असतील," असे ठाम मत त्यांनी मांडले.या वादाची सुरुवात TMC आमदार हुमायूं कबीर यांच्या घोषणेने झाली. कबीर यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा येथे ६ डिसेंबर रोजी 'बाबरी' नावाच्या नव्या मशिदीची पायाभरणी करण्याची घोषणा केली आहे. या मशिदीला पूर्ण होण्यासाठी सुमारे 3 वर्षे लागतील, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आणि TMC मध्ये जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे.