संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्याच पद्धतीची अंगावर काटा आणणारी हत्या सिंधुदुर्गात झाल्याचं समोर आलं आहे. कुडाळच्या सिद्धिविनायक बिडवलकरचा खून करण्यात आला. त्याचा मृतदेह रात्रीत जाळण्यात आला. नंतर त्याची राख, हाड नदीत फेकून देण्यात आली. दोन वर्षापर्यंत हे कुणालाच माहित नव्हते. मात्र आता या खूनाचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणात सिद्धेश शिरसाटसह एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. हा आरोपी शिवसेना शिंदे गटाचा आहे. शिवाय या हत्ये मागचा खरा आका कोण असा प्रश्न उपस्थित करत माजी आमदार वैभव नाईक यांनी राणेंकडे बोट दाखवले होते. याला आता आमदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
माजी आमदार वैभव नाईक यांनी आरोपी सिद्धेश शिरसाट हा निलेश राणेंचा कार्यकर्ता असल्याचं म्हटलं आहे. शिवाय त्याला वाचवण्यासाठी स्थानिक आमदारांनी प्रयत्न केले असा आरोपही केला आहे. त्याच बरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रविद्र फाटक यांच्या बरोबरचे आरोपीचे फोटो ही सोशल मीडियावर टाकले आहेत. त्याला आता निलेश राणे यांनी प्रत्युत्त दिले आहे. जे काही नाईक यांनी आरोप केले आहेत, त्याचा आपण खुलासा करत आहोत. शिवाय सिंधुदुर्गमध्ये येवून याबाबत पत्रकार परिषद घेणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं. नाईक यांचा हे प्रकरण संतोष देशमुख प्रकरणा सारखे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे असा आरोप राणे यांनी केला. त्यातून ते जिल्ह्याचं नाव कसं खराब होईल हे त्यांचे प्रयत्न आहेत असंही ते म्हणाले.
सिद्धिविनायक बिडवलकरचा मर्डर झाला. या प्रकरणी सिद्धेश शिरसाटला अटक झाली. हा मर्डर दोन वर्षापूर्वी झाला. त्यावेळी हा सिद्धेश शिरसाट कोणत्या पक्षात होता असा प्रश्न निलेश राणे यांनी केला आहे. त्यावेळी तो उबाठामध्ये होता. तो वैभव नाईक यांच्या सोबत होता. त्याचे वैभव नाईकां सोबत फोटो आहेत. त्यामुळे खून करून बॉडी कुठे लपवली हे नाईकांनीच सांगितले पाहीजे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली पाहीजे असं ही ते म्हणाले. आपण शिवसेनेत आठ महिन्यापूर्वी आलो. त्यामुळे शिरसाटबद्दल जास्त माहिती नाईकांनाच असेल असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - गाडीत मृतदेह? धावत्या कारमधील लटकलेला हात कुणाचा? 'त्या' VIDEOचे धक्कादायक सत्य
या आधी ही राणे कुटुंबीयांवर आरोप झाले आहे. आम्हाला त्याचा फरक पडणार नाही. तेंव्हा ही नाही पडला, तर आता काय पडणार असं ही निलेश राणे म्हणाले. पण या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खेचू नका. जे काही बोलायचं आहे ते मला बोला. आमच्या नेत्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. तुम्ही मतदार संघाचं वाटोळं केलं आहे. तुम्हाला जिल्ह्याला बदनाम करायचं आहे, असं सांगत निलेश राणे यांनी नाईक यांनाच फटकारलं आहे. शिवाय सिद्धेश शिरसाट याचे उबाठा बरोबर काय संबध होते याचा पर्दाफाश आपण पत्रकार परिषदेत करणार असल्याचं ही त्यांनी सांगितलं.