'राजा विरुद्ध जर कुणी प्रखर मत मांडले तर ते सहन केल पाहिजे' गडकरींचा टोमणा कोणाकडे?

'लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरूध्द कितीही प्रखर पणे जर कुणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे.'

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या परखड वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी पुण्यात केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी केलेल्या त्या विधानाचे वेगवेगळे अर्थ ही लावले जात आहेत. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरूध्द कितीही प्रखर पणे जर कुणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे. त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेकमा कोणाकडे याबाबत आता राजकीय वर्तूळात चर्चा सुरू झाली आहे. यातील राजा कोण आणि प्रखर मत मांडणारे कोण याबाबतही वेगवेगळे तर्क काढले जात आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गडकरी बोलताना थेट म्हणाले. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरूध्द कितीही प्रखर पणे जर कुणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे. त्या विचारांवर चिंतन केले पाहिजे. हीच खरी लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पुणे येथे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण यांच्या अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सध्याची राजकीय स्थिती पाहाता याचे वेगवेळे अर्थ काढले जात आहेत. गडकरी हे प्रसंगी स्वतःच्या पक्षावर, पक्ष नेतृत्वावर आणि राजकीय स्थितीवर मनमोकळे भाष्य करण्याविषयी जाणले जातात. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की...' पाटलांचे थेट आव्हान

पुढे गडकरी म्हणतात, देशात विचार भिन्नता ही समस्या नाही, तर आपल्या देशामध्ये विचार शून्यता ही समस्या आहे. आपण उजवे नाहीत किंवा डावे देखील नाही, तर आपण लोकांना माहीत असलेले संधीसाधू आहोत, असेही गडकरी यावेळी म्हणाले. आपण जीवनात एक ठाम भूमिका घ्यायला हवी. आपले विचार स्पष्टपणे, निर्भयपणे मांडायला हवे असंही सांगायला ते विसरले नाहीत. साहित्यकांबद्दल, कविंबद्दल, विचारवंतांबद्दल तरी ही अपेक्षा आहे, की त्यांनी आपल्या मनातले विचार परखड पणे मांडले पाहिजे. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा जर कोणती असेल तर राजाच्या विरूध्द कितीही प्रखर पणे जर कुणी विचार मांडले तर राजाने ते सहन केले पाहिजे. त्या विचारांवर चिंतन केले पाहिजे, हीच खरी लोकशाहीमध्ये अपेक्षा आहे हे त्यांनी थेट सांगितले आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; आज बीड आणि धाराशिव बंदची हाक

टीकेचे जीवनातील मूल्य विशद करताना आपल्या बालपणीची एक आठवण देखील त्यांनी या वेळी सांगितली. माझी आई मला नेहमी लहानपणी सांगायची की, निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे आपल्याला दिशा देणारा, सांगणारा तो निंदा करणारा माणूस जो सांगतो की आपले काय चुकले आहे. ही गोष्ट सर्वांसाठी महत्वाची आहे असेही ते म्हणाले. काही दिवसां पूर्वी गडकरींनी आपल्याला पंतप्रधानपदाची ऑफर होती हे विधान करून खळबळ उडवून दिली होती. शिवाय आताचे वक्तव्य हे गडकरींचे कोणाला टोमणे आहेत? त्याचा अर्थ काय? यावर आता चर्चा रंगली आहे. 

Advertisement