विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय, 'या' यात्रेनं वारं फिरणार?

आता त्या पाठोपाठ ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
जालना:

विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. पुढील दोन तिन महिन्यात विधानसभा निवडणुका राज्यात होतील. त्या आधी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले आहेत. उपोषणाला बसण्या आधी त्यांनी शांतता रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली मराठवाड्यात झाली. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. आता त्या पाठोपाठ ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. त्यांनी ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातले वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावर आणखी तापण्याची दाट शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देवू नये अशी ओबीसींची मागणी आहे. ओबीसींचे आरक्षण टिकले पाहाजे अशी त्यांची भूमीका आहे. त्यासाठी आता ओबीसी समाजही आक्रमक झाला आहे. त्यामुळे ओबीसी नेते  लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढणार आहेत. ही यात्रा 22 ते 25 जुलैपर्यंत यात्रा चालणार आहे. सुरूवातीला ही यात्रा जालना,बीड,परभणी, जिल्ह्यातून जाणार आहे. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. या निमित्ताने मराठवाडा पुन्हा एकदा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  'विधानसभा निवडणूक महायुतीच्या नेतृत्वात लढणार'; चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रे आधी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली कढली होती. या रॅलीचे केंद्रही मराठवाडाच होता. मराठवाड्याच्या जिल्ह्यातून ही यात्रा निघाली. या यात्रेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर जरांगे पाटील हे उपोषणालाही बसले आहेत. ते ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहीजे यावर ठाम आहेत. जो पर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

(नक्की वाचा-  उद्धव ठाकरेंची विधानसभेसाठीची रणनिती ठरली; संपर्कप्रमुखांना दिले महत्त्वाचे निर्देश)

 एकीकडे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाची ही ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा निघत आहे. शिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकरही आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकी पूर्वी राज्यातले वातावरण आरक्षणावरून चांगलेच ढवळणार आहे. 25 जुलैपासून प्रकाश आंबेडकरांची देखील आरक्षण बचाव यात्रा निघणार आहे. त्यामुळे निवडणुकीचं वारं कोणत्या दिशेने फिरणार हे ठरवणाऱ्या या यात्रा असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अडचणीचा ठरला होता. लोकसभेला त्याचा मोठा फटका महायुतीला बसला. महाविकास आघाडीने राज्यात जोरदार मुसंडी मारली होती. 

Advertisement