BJP vs Congress : 'पाकिस्तान के यार' काँग्रेसच्या 'PM गायब' फोटोला भाजपानं दिलं उत्तर

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारला पाठिंबा देण्याचं आश्वासन विरोधी पक्षांनी दिलंय. पण, या हल्ल्यानंतर आठवडाभरानंतर काँग्रेसकडून 'एक्स' वर केलेल्या पोस्टनंतर राजकारण तापलं आहे. काँग्रेसनं सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो या या वादाचं कारण बनला आहे. काँग्रेसच्या फोटोला भाजपानंही नवा फोटो प्रसिद्ध करत उत्तर दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

काँग्रेसनं सोशल मीडियावर एक डोकं नसलेला फोटो शेअर केलाय. त्याला गरज असताना गायब असं कॅप्शन देण्यात आलं. काँग्रेसनं कुणाचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याचा आरोप भाजपानं केला. 

( नक्की वाचा : 'तर कुणी म्हणेल महात्मा गांधी इंग्रजांचे नोकर होते,' सुप्रीम कोर्टानं सावरकर प्रकरणात राहुल गांधींना फटकारले )
 

काँग्रेसनं 'सर तन से जुदा' चा फोटो शेअर करत सर्व शंकांना पूर्णविराम दिला आहे. हे केवळ राजकीय वक्तव्य नाही. तर मुस्लीम व्होट बँक आणि पंतप्रधानांना टार्गेट करणारी ही एक छुपी चिथावणी' आहे, असा आरोप भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला. 

भाजपाकडून फोटो शेअर

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आरपी सिंह यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. पांढरा टी शर्ट आणि काळी पँट घातलेल्या व्यक्तीचा हा पाठमोरा फोटो आहे. त्या व्यक्तीनं नेहरु टोपी घातलीय. 

Advertisement

त्या व्यक्तीची पाठ कॅमेऱ्याकडे आहेत. त्याचे दोन्ही हात मागे असून त्यानं उजव्या हातामध्ये मोठा सुरा पकडला आहे. 'पाकिस्तान के यार' असं कॅप्शन सिंह यांनी या फोटोला दिलं आहे. हा फोटो कुणाचा आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी काँग्रेस नेते राहुल गांधींशी या फोटोचं साधर्म्य आहे. 

पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारवर हल्ला करून मुस्लीम मतदारांची मर्जी मिळवण्यासाठी काँग्रेसवर 'षड्यंत्र' रचल्याचा आरोप भाजपाकडून सातत्यानं करण्यात येत आहे. त्याच मालिकेत 'पाकिस्तान का यार' हे कॅप्शन असलेला फोटो शेअर करण्यात आला आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटीया यांनी तर 'लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस' असा आरोप केला आहे. 

Advertisement