
Supreme Court on Rahul Gandhi In Veer Savarkar Remark : स्वांत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना चांगलेच फटकारले. स्वातंत्र्य सैनिकांच्या विरोधातल्या वक्तव्यांना परवानगी दिली जाणार नाही. यंदा सावरकरांबद्दल आहे, पुढच्या वेळी कुणीातरी महात्मा गांधी यांना इंग्रजांचे नोकर म्हणेल. तुम्ही पुढच्या वेळी देखील या पद्धतीनं शेरेबाजी केली तरी कोर्ट त्याची स्वत:हून दखल घेईल, या शब्दात राहुल गांधींना सुनावलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले कोर्ट?
सर्वोच्च न्यायालयानं राहुल गांधींना सुनावलं की, महाराष्ट्रात सावरकर पूजनीय आहेत. तुम्ही आपल्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असं बोलू शकत नाही. तुम्ही नीट वागा, अन्यथा अडचणीत याल. तुम्ही या प्रकारचं वक्तव्य का केलं? असा सवालही कोर्टानं राहुल यांना केला आहे. त्याचबरोबर राहुल गांधी यांच्या विरोधात खालच्या कोर्टात सुरु असलेल्या खटल्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
( नक्की वाचा : इंदिरा गांधी संविधानविरोधी होत्या? श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना सवाल, लोकसभेत जोरदार गदारोळ )
'इतिहास माहिती असता तर...'
महात्मा गांधींनी देखील ब्रिटीशांशी संवाद साधताना 'तुमचा विश्वासू सेवक' हे शब्द वापरले होते, हे राहुल गांधींना माहिती आहे का? असं सर्वोच्च न्यायालयानं अभिषेक मनू संघवी यांना विचारलं. न्या. दीपांकर दत्ता पुढं म्हणाले की , तुम्हाला इतिहास माहिती असता तर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांबद्दल असं बोलला नसता. एका राजकीय पक्षाचे नेते असूनही तुम्ही या प्रकारचं वक्तव्य का करता? महाराष्ट्रात सावरकरांची पूजा केली जाते. तिथं जाऊन तुम्ही सावरकरांच्या विरोधात वक्तव्य केलं, हे घडता कामा नये, असं न्या. दत्ता यांनी स्पष्ट केलं.
( नक्की वाचा : सावरकरांबद्दल प्रेम, सरसंघचालकांचं समर्थन, काँग्रेसला सल्ला! सुशीलकुमार शिंदेंच्या आत्मचरित्रानं खळबळ )
न्यायमूर्ती दत्ता यांनी राहुल गांधींचे वकील अभिषेक सिंघवी यांना विचारले की, 'तुमच्या अशिलाला माहीत आहे का की त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनीही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र पाठवले होते. त्यांना इतिहास माहीत असता तर त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांना अशी वागणूक दिली नसती.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world