स्वानंद पाटील, प्रतिनिधी
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. परभणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती परळी शहर पोलिसांनी दिली. या तरुणावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबात अत्यंत अश्लील प्रतिक्रिया व्यक्त करुन जाणीवपूर्वक भावना दुखवणे आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल माध्यमावर व्यक्त होणाऱ्या एकाविरुद्ध परळीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या आरोपीने इन्स्टाग्राम वर पंकजा मुंडे यांच्या विषयी अत्यंत अश्लील शब्दांत एक प्रतिक्रिया(comment)टाकली. या प्रतिक्रियेमुळे भावना दुखावल्या जाणे तसेच दोन जातीमध्ये किंवा दोन गटात द्वेषाची भावना निर्माण होईल याची कल्पना असताना देखील जाणीवपुर्वक इंस्ट्राग्रामवर ही पोस्ट टाकल्या प्रकरणी आरोपीविरुद्ध 93/2024 कलम 153 (अ), 505 (2) भादवी सह कलम 67 IT Act प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात होतं तणावाचं वातावरण
बीड लोकसभा मतदासंघातील चुरशीच्या निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या. या पराभवाचे पडसाद मराठवाड्यात उमटले आहेत. पंकजा यांच्या काही समर्थकांनी टोकाचा निर्णय घेत त्यांचं आयुष्य संपवलं. पंकजा मुंडे यांच्या पराभवानं ते हताश झाले होते. तर दुसरिकडं सोशल मीडियावर पंकजा यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या होत्या.
ट्रेंडींग बातमी - 'वडीगोदरीमध्ये पाहा, वाह रे वाह', पंकजा मुंडे यांचा इशारा कुणाकडं?
या आक्षेपार्ह पोस्टच्या विरोधात ओबीसी समाज आक्रमक झाला होता. त्यांनी बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासार ,परळी वैजनाथ, वडवणी,शिरसाळा या चार गावात बंद पुकारला होता..तर बीड,धारूर,केज या तीन गावात प्रशासनाला निवेदन देत पंकजा मुंडे यांच्यावर पोस्ट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.