Raigad ZP Result : कर्जतमध्ये भाजप-शिंदे सेनेचा सुपडा साफ, सुधाकर घारे यांच्या पत्नी विक्रमी मतांनी विजयी

राज्यात एकूण 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. रायगडच्या कर्जतमध्ये एकनाथ शिंदे शिवेसना गट आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Raigad Karjat ZP Election 2026 Result
मुंबई:

मेहबूब जमादार, प्रतिनिधी

Raigad ZP Election 2026 Result Update : राज्यात एकूण 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. रायगडच्या कर्जतमध्ये एकनाथ शिंदे शिवेसना गट आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. परिवर्तन विकास आघाडीने 6 पैकी 6 जिल्हा परिषद आणि 12 पैकी 11 पंचायत समितीमध्ये विजय मिळवला आहे.

कर्जतमध्ये शिवसेना-ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने परिवर्तन विकास आघाडी केली होती. कर्जतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाने 4 जिल्हा परिषद तर शिवसेना ठाकरे गटाने 2 जिल्हा परिषदेवर विजयी झेंडा फडकवला आहे.राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता सुधाकर घारे यांचा  ४६५० विक्रमी मताधिक्यांनी विजय झाला आहे. 

इथे पाहा रायगड जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

जिल्हा परिषद

एकूण जागा 59
जाहीर निकाल 50

भाजप 12
शिवसेना 16
राष्ट्रवादी काँग्रेस - 16
शिवसेना ubt - 5
काँग्रेस -1
शेकाप 0

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात शिवसेना ठाकरे गटाची मशाल पेटली, 'या' निकालाची राज्यभर चर्चा, गड आला पण सिंह गेला..

सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातून येथे शिवसेना (शिंदे गट) च्या शर्मिला शरद बोडके यांनी भाजपच्या उमेदवार आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी व माजी जिप अध्यक्षा नीलिमा पाटील यांचा २,९३१ मतांच्या फरकाने दणदणीत पराभव केला. नीलिमा पाटील यांना ७,१२९ मते मिळाली, तर शर्मिला बोडके यांनी १०,०६० मते मिळवत 'जायंट किलर' ठरण्याचा मान मिळवला.

कर्जतच्या 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समित्यांचा निकाल


कळंब - जिल्हा परिषद

१. नारायण डामसे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 11083 (234 मतांनी विजयी)
२. हरिश्चंद्र निरगुडा (शिवसेना) एकुण मते - 10849
३. Nota - 437

Advertisement

पोशिर - पंचायत समिती 
१. हर्षला वेहले (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 4833
२. रेश्मा जोशी (शेकाप) एकुण मते - 5857 (974 मतांनी विजयी)
३. Nota - 197

कळंब - पंचायत समिती 
१. कमलाबाई शिंगवा (उबाठा) एकुण मते - 6475 (1747 मतांनी विजयी)
२. निलम ढोले (शेकाप) एकुण मते - 4728
३. Nota - 307

Advertisement

कशेळे - जिल्हा परिषद
१. वर्षा सुरेश दोरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 12752 (3719 मतांनी विजयी)
२. प्रमिला भरत शिद (शिवसेना) एकुण मते - 9033
३. Nota - 382

पाथरज - पंचायत समिती
१. कविता भरत पादिर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते- 6836 (1971 मतांनी विजयी)
२. अश्विनी कांता पादिर (शेकाप) एकुण मते- 4865
३. Nota - 251

Advertisement

कशेळे - पंचायत समिती
१. अक्षय राम तिटकारे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 5689 (1419 मतांनी विजयी)
२. सचिन बाळकृष्ण भोईर (शिवसेना) एकुण मते - 4270
३. Nota - 109

नेरळ - जिल्हा परिषद
१. सुनिता सुरेश टोकरे (शिवसेना) एकुण मते - 9864
२. सुनिता रोहिदास मोरे (उबाठा) एकुण मते - 10747 (883 मतांनी विजयी)
३. Nota - 503

नेरळ - पंचायत समिती
१. असिफ अत्तार (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) एकुण मते - 357
२. नम्रता कांदळगावकर (भाजपा) एकुण मते - 3627
३. भगवान चंचे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 6995 (3368 मतांनी विजयी)
४. उषा कृष्णा पारधी (अपक्ष) एकुण मते - 136
५. Nota - 199

दामत - पंचायत समिती
१. महेश खारीक (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 4703 (1190 मतांनी विजयी)
२. नरेश मसणे (भाजपा) एकुण मते - 3513
३. सुमित साबळे (अपक्ष) एकुण मते - 1487
४. Nota - 93

कडाव - जिल्हा परिषद
१. योगेश कांबेरे (शिवसेना) एकुण मते - 9323
२. मारुती घारे (उबाठा) एकुण मते - 11278 (1955 मतांनी विजयी)
३. Nota -164

वाकस - पंचायत समिती
१. अमोल जाधव (शिवसेना) एकुण मते - 4484
२. नितिन धुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 5498 (1014 मतांनी विजयी)
३. Nota - 225

कडाव - पंचायत समिती
१. सुषमा चेतन पवाळी (उबाठा) एकुण मते - 5656 (699 मतांनी विजयी)
२. संध्या सुदाम पवाळी (शिवसेना) एकुण 4957
३. Nota - 220

माणगाव तर्फे वरेडी - जिल्हा परिषद
१. राधिका किशोर ठाकरे (भाजपा) एकुण मते - 5078
२. सुवर्णा प्रदीप ठाकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 8714 (19 मतांनी विजयी)
३. रेश्मा योगेश मिसाळ (शिवसेना) - 8695
४. Nota - 196

माणगाव तर्फे वरेडी - पंचायत समिती
१. महेश सुरेश विरले (शिवसेना) एकुण मते - 5980 (178 मतांनी विजयी)
२. संदेश रमेश हजारे (उबाठा) एकुण मते - 5802
३. Nota - 200

उक्रुळ - पंचायत समिती
१. प्रियंका जितेंद्र पाटील (मनसे) एकुण मते - 2770
२. सुप्रिया राजेश भगत (भाजपा) एकुण मते - 2672
३. नमिता लहु श्रीखंडे (उबाठा) एकुण मते - 5519 (2749 मतांनी विजयी)
४. Nota - 218

मोठे वेणगाव - जिल्हा परिषद
१. उषा अंकुश ठोंबरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 13142 (5547 मतांनी विजयी)
२. संगिता वसंत वाघमारे (शिवसेना) एकुण मते - 7595
३. Nota - 268

मोठे वेणगाव - पंचायत समिती
१. चित्रा जगदीश ठाकरे (उबाठा) एकुण मते - 5108 (617 मतांनी विजयी)
२. श्वेता प्रसाद थोरवे (शिवसेना) एकुण मते - 4491
३. Nota - 177

बीड बुद्रुक - पंचायत समिती
१. नमिता सुधाकर घारे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) एकुण मते - 7970 (4508 मतांनी विजयी)
२. सोयराबाई प्रमोद सुर्वे (शिवसेना) एकुण मते - 3462
३. Nota - 186