संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. यात वक्फ बोर्ड विधेयकासह 16 विधेयके मांडली जाणार असल्याची शक्यता आहे. ही सर्व विधेयक संसदेत मंजूर करण्यासाठी सत्ताधाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मणिपूर हिंसाचार, महाराष्ट्रातला एकतर्फी विजय आणि ईव्हीएम संदर्भात विरोधक प्रश्न उपस्थित करण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - एकटा पडला 'राजा', इंजिन धोक्यात; आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक
जातनिहाय जनगणना आणि दिल्लीतील प्रदुषणावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवाय भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचा मुद्दाही विरोधक संसदेत उचलणार आहेत. या सर्व मुद्द्यांवरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गदारोळ होण्याची शक्यता आहे. संसदेच्या अधिवेशनात वक्फ विधेयक मांडलं जाणार आहे. सध्या हे विधेयक जेपीसी कडे वर्ग करण्यात आलं आहे. जेपीसीच्या अहवालानंतर हे विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे.
नक्की वाचा - Election Result 2024 : दोन राज्य मात्र विजयाचा एक फॉर्म्युला; महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये काय ठरलं गेमचेंजर?
संसदेच्या अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?
- मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा विरोधक उचलणार
- दिल्ली प्रदूषणाचा मुद्दा विरोधक मांडणार
- जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर विरोधक आक्रमक होणार
- संसदेत महाराष्ट्रातील एकतर्फी विजयानंतर इव्हीएमचा मुद्दा उचलणार…
- वक्फ विधेयकावरून विरोधकांना सत्ताधारी पक्षातील चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची साथ मिळण्याची शक्यता
- महाराष्ट्र आणि हरियाणातील विजयामुळं सत्ताधारी पक्षाचा विश्वास दुणावला आहे.