- PM मोदींचा भेळ खाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर 24 तासांत 100 मिलियनहून अधिक व्ह्युज
- 19 एप्रिल 2026 रोजी पश्चिम बंगालमधील झारग्राम येथे निवडणूक प्रचारादरम्यान PM मोदींनी खाल्ली भेळ
- स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी तळागाळातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत स्थानिकांशी जवळीक वाढवली
PM Modi Viral Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी एका छोट्या स्टॉलवरून भेळ विकत घेऊन खातानाचा व्हिडीओ मागील दोन दिवसांत अनेकदा पाहिला असेल. पंतप्रधान मोदींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 24 तासांत या व्हिडीओला 100 मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाले असून गुगल सर्च ट्रॅफिकमध्ये 22 वर्षांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. 19 एप्रिल 2026 रोजीचा हा व्हिडीओ आहे. या दिवशी पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने चार सभांना संबोधित केले. यादरम्यान झारग्राममध्ये त्यांनी थोडीशी विश्रांती घेत स्थानिकांशी संवाद साधला. प्रचार आणि सर्वसामान्यांशी संवाद साधण्याची त्यांची ही जुनी पद्धत आहे. ही पद्धत नेहमीच यशस्वी ठरलीय आणि यावेळीही तसेच घडले. आतापर्यंत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 12 कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय, लाइक आणि शेअर देखील केलाय. ही संख्या इतकी महत्त्वाची आहे कारण पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू यासारख्या निवडणूक होणाऱ्या राज्यांतील एकूण मतदारांची संख्याही यापेक्षा कमी आहे.
राजकीय टीका
अर्थात भेळीच्या व्हिडीओवरून पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांनी यास नाटक म्हटले आहे. जर हे आधीच ठरलेले नव्हते, तर तिथे एकापेक्षा जास्त कॅमेरे कसे उपस्थित होते? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
(नक्की वाचा: PM Modi Video Viral :PM मोदींनी खाल्ली भेळ, पण दुकानदाराला का होतोय प्रचंड पश्चात्ताप? घडली मोठी चूक)
राजकीय आरोप-प्रत्यारोप बाजूला ठेवले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवडणूक प्रचार शैली बारकाईने पाहिल्यास एक गोष्ट स्पष्ट होते - त्यांना वेगवेगळ्या राज्यांची संस्कृती, खाद्यपदार्थ, समस्या, स्थानिक प्रश्न आणि संस्कृतीची सखोल जाण आहे. भेळ (झालमुरी) बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंडसह देशाच्या अनेक भागात खाल्ला जाणारा पदार्थ आहे. बंगालमध्ये हे स्ट्रीट फूड अतिशय लोकप्रिय आहे.
स्थानिक लोकांशी पीएम मोदींचा संवाद
पंतप्रधान मोदी अनेकदा ज्या राज्यात जातात, तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. यातून ते तळागाळातील लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करतात. केवळ खाण्यापिण्यापर्यंतच नव्हे तर त्यांच्या प्रत्येक भाषणात, संवादात आणि लेखनात त्या भागाशी असलेल्या जवळीकीचे दर्शन घडते. म्हणूनच त्यांचा संदेश प्रत्येक राज्यात वेगळ्या रंगात आणि प्रभावाने उमटतो.
Photo Credit: X
PM मोदी त्यांच्या प्रत्येक निवडणूक मोहिमेसाठी एक रणनीती तयार करतात. ज्यामध्ये प्रचार कसा आणि कोणत्या माध्यमातून करायचा, तसेच सामान्य जनतेला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या असतील? यावर भर दिला जातो. बिहारची निवडणूक असो किंवा आसाममध्ये स्थानिक भाषेतून भाषण सुरू करण्याची त्यांची शैली असो, लोकांच्या मनात स्थान निर्माण करणे हेच यामागील मुख्य उद्दिष्ट असते. त्यांच्या प्रचार शैलीची मुळे गुजरातच्या काळापासून जोडलेली आहेत.