भाषण सुरु असतानाच बसले मोदी, राहुल गांधींवर भडकले अध्यक्ष! नेमकं काय झालं?

PM Modi Lok Sabha Speech :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाच्या दरम्यान विरोधांनी जोरदार अडथळे आणले.

Advertisement
Read Time: 1 min
नवी दिल्ली:

PM Modi Lok Sabha Speech :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेतील भाषणाच्या दरम्यान विरोधांनी जोरदार अडथळे आणले. विरोधकांच्या गोंधळामुळे मोदी काही काळ भाषण थांबवून खाली बसले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना चांगलंच सुनावलं. राहुल विरोधी पक्षांच्या खासदारांना संसदेतील मोकळ्या जागेत जाण्यासाठी प्रवृत्त करत आहेत, असा आक्षेप अध्यक्षांनी नोंदवला. लोकसभा अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर पंतप्रधानांनी पुन्हा एकदा भाषण सुरु केलं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात पहिल्यांदाच खासदारांचा उल्लेख केले. 'लोकसभेत पहिल्यांदाच खासदार झालेल्या व्यक्तींनी त्यांचे विचार मांडले. संसदेतील सर्व नियमांचं त्यांनी पालन केलं. एखद्या अनुभवी खासदारांसारखा त्यांचा व्यवहार होता. त्यामुळे पहिल्यांदाच सभागृहात आल्यानंतरही त्यांच्यामुळे सभागृहाची प्रतिमा उजळली आहे. त्यांनी या चर्चेत वैचारिक योगदान दिलं.

'काही लोकांचा त्रास समजू शकतो

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, 'हे जगातील सर्वात मोठे निवडणूक अभियान होते. देशातील जनतेनं या सर्वात मोठ्या निवडणूक अभियानातून आमची निवड केली. मी काही जणांचा त्रास समजू शकतो. सतत खोटं बोलल्यानंतरही त्यांचा मोठा पराभव झाला आहे.'
 

Advertisement

( नक्की वाचा : 'काही लोकांचा त्रास समजू शकतो', PM मोदींचा विरोधकांवर प्रहार )