PM Narendra Modi Video : पीएम नरेंद्र मोदींच्या 'या' व्हिडीओनं केला जागतिक विक्रम! जगभरात झालाय तुफान व्हायरल

पीएम मोदींनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ जगभरात इतका व्हायरल झाला की, त्या व्हिडीओला 341 मिलियन व्हूज मिळाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
PM Narendra Modi Latest Video

PM Narendra Modi Viral Video : नीट पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरंवून टाकलं. देशभरातील तरुणांनी या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेतली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांसोबत (Gen z) दिल्लीच्या जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलन उभं केलं. सोनम वांगचूक यांच्या ऐतिहासिक उपोषणानंतर अखेर भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. जेन झींच्या या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं.पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर पीएम मोदींनी सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाऊंट्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ जगभरात इतका व्हायरल झाला की, त्या व्हिडीओला 341 मिलियन व्हूज मिळाले आहेत. याबाबतच्या पोस्ट इन्स्टाग्रामवर व्हायरल झाल्या आहेत.

पीएम नरेंद्र मोदी त्या व्हिडीओत काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपर लीक प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं मोठं विधान केलं. ते म्हणाले, "देशातील तरुणांचं हित आणि त्यांचं भविष्य आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.पेपर लीकच्या सर्व प्रकरणांमध्ये दोषींना लवकरात लवकर शिक्षा देण्यासाठी आणि या प्रकरणाची तातडीनं सुनावणी होण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट गठित केलं जाईल. या संबंधीत विभागांना आवश्यक कारवाई करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांचं हित जपण्यासाठी सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णय प्रक्रियेतील हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.तरुणांच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही."

Advertisement

मोदींनी एक्सवर नुकतंच पोस्ट केलेल्या एका व्हिडीओत म्हटलंय,"फ्रेंड्स पेपर लीक एखादा छोटा विषय नाहीय.यामुळे लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना खूप दु:ख होतं. मागील अडीच वर्षात पेपर लीकच्या घटनेनंतर सरकारने अनेक पावलं उचलली आहेत.

दोषींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.विद्यार्थ्यांचं एक वर्ष फुकट जाऊ नये,यासाठी कमीत कमी वेळेत जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याची व्यवस्था करण्यात आली. 19 जुलै रोजी NEET फेरपरीक्षेचे निकालही जाहीर करण्यात आले.देशभरातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या बातम्या समोर आल्या. सरकार फक्त एवढ्या कारवाईवर समाधानी होणार नाहीय. 

Advertisement