- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेसचा मोठा पराभव झाला
- ममतांपासून जवळपास साठ पेक्षा जास्त आमदार वेगळे झाले आहेत
- ममता बॅनर्जींच्या विरोधात बंडखोर १९ खासदारांची यादी समोर आली आहे
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमुल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर तृणमुल काँग्रेसमध्ये सर्वा काही ठिक नाही. ममता बॅनर्जीं विरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली आहे. त्याचा परिणाम म्हणून पक्षात मोठी फुट पडली आहे. आधी आमदारांचा एक मोठा गट वेगळा झाला. जवळपास 60 पेक्षा जास्त आमदार ममतांपासून दुर झाले. त्यानंतर ही पक्षातली गळती कमी होताना दिसत नाही. आमदारांनंतर आता खासदार ही ममतांपासून चार हात लांब राहण्याच्या तयारीत आहे. ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बंड पुकारणाऱ्या 19 खासदारांची अधिकृत यादीच आता समोर आली आहे. विशेष म्हणजे ममतांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळचे खासदारांचे नाव ही या यादीत आहेत.
या बंडखोर खासदारांच्या यादीत 19 खासदारांची नावे आहेत. त्यांची यादी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना देण्यात आली आहे. यांनी एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा दिल्याची घोषणा ही केली आहे. या गटाचे नेतृत्व काकोली घोष दस्तीदार करत आहेत. या शिवाय शत्रुघ्न सिन्हा, माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आणि युवा नेत्या सयोनी घोष यांसारख्या बड्या नावांचा समावेश या यादीत आहे. बंडखोर खासदारांनी काकोली घोष यांची आपला गटप्रमुख म्हणून निवड केली आहे. आम्ही ममता बॅनर्जींसोबत वाईट काळातही होतो, पण गेल्या 3 ते 4 वर्षांत पक्षाची धोरणे बदलली असून गरिबांचे प्रश्न सुटत नव्हते, असा आरोप काकोली घोष यांनी केला आहे.
या बंडखोरीत सर्वात धक्कादायक नाव हे सयोनी घोष यांचे आहे. सयोनी या ममता बॅनर्जींच्या अत्यंत जवळच्या मानल्या जात होत्या. शिवाय सयोनी यांना ममता बॅनर्जींचा पर्याय म्हणून पाहिले जात होते. अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना टीएमसीच्या युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्षपदही दिले होते. दुसरीकडे, आसनसोलचे खासदार शत्रुघ्न सिन्हा आणि बहरामपूरमधून काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांचा 85,000 हून अधिक मतांनी पराभव करणारे युसूफ पठाण यांनीही ममता बॅनर्जींची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या बंडखोर खासदारांनी काही दिवसांपूर्वीच भाजप नेते भूपेंद्र यादव आणि सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतली होती.
बंडखोर खासदारांची संपूर्ण यादी
- काकोली घोष (बारासात)
- जगदीश चंद्र बसुनिया (कूचबिहार)
- खली उर रहमान (जंगीपुर)
- यूसुफ पठान, (बेहरामपुर)
- अबू ताहिर खान, (मुर्शिदाबाद)
- पार्थ भौमिक (बैरकपुर)
- बापी हलधर (मथुरापुर)
- सयोनी घोष (जादवपुर)
- माला रॉय (कोलकाता दक्षिण)
- मिताली बाग (आरामबाग)
- दीपक अधिकारी (घाटल)
- कालीपद सोरेन (झालग्राम)
- जून मालिया (मेदिनीपुर)
- अरूप चक्रवर्ती (बांकुड़ा)
- डॉ. शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व)
- शत्रुघ्न सिन्हा (आसनसोल)
- असित कुमार मल (बोलपुर)
- शताब्दी रॉय (बीरभूम)
- रचना बनर्जी (हुगली)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world