क्रिकेटपटू इशान किशनचे वडील प्रणव किशन गेल्या वर्षी 27 ऑक्टोबरला मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल-युनायटेड पक्षात सामील झाले होते. त्यावेळी जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा म्हणाले होते की, "आम्ही सर्व मिळून बिहारला पुढे नेऊ. आता प्रणव यांना पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना जेडीयूच्या राजकीय सल्लागार टीममध्ये स्थान मिळाले आहे. नवीन जबाबदारी मिळाल्याने आपण खूप आनंदी आहोत असं ते यानिमित्ताने म्हणाले. येणाऱ्या काळात गरज पडल्यास इशान किशनही जदयूसाठी प्रचार करेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खरं तर, इशान किशनचे वडील प्रणव कुमार पांडे जेडीयूमध्ये सामील होऊन आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. पण आता जेडीयूने त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाला राजकीय सल्ले देणाऱ्या महत्त्वपूर्ण समितीमध्ये त्यांना स्थान देत राजकीय सल्लागार बनवले आहे. राजकीय सल्लागार बनल्यानंतर प्रणव हे खूप उत्साही आहेत. पक्षाने आपल्यावर एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्यासाठी मी कोणतीही कसर सोडणार नाही. असं ते नवी जबाबदारी मिळाल्यानंतर म्हणाले.
जेव्हापासून मी राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली आहे, तेव्हापासून नितीशजींचे काम पाहून मी खूप प्रभावित झालो आहे. त्यामुळेच जेव्हा मी राजकारणात पुढे जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मी जेडीयूमध्ये सामील झालो. आता मला जबाबदारीही मिळाली आहे, जी मला पूर्ण करायची आहे, ही जबाबदारी आपण नक्कीच पूर्ण करू असं ही ते म्हणाले. पुढे ते असं ही म्हणाले की नितीशजींचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवायचे आहे, त्यासाठी मला अधिकाधिक जनतेशी जोडले जायचे आहे, असं ते म्हणाले.
येणाऱ्या काळात निवडणूक लढणार का याबाबतही त्यांना विचारण्यात आले. त्यावर बोलताना ते म्हणाले हे सर्व पक्षाला ठरवायचे आहे. मी एक छोटा सैनिक आहे, पक्षाने जी काही जबाबदारी दिली, ती पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेन असं ते म्हणाले. इशान किशनला राजकारणात फारसा रस नाही, पण मी राजकारणात आल्याने तोही उत्साहित आहे. क्रिकेटमधून त्याला वेळ मिळाला, तर निवडणुकीच्या वेळी तो जेडीयूसाठी प्रचारही करू शकतो असं प्रणव यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात इशान किशन क्रिकेटच्या मैदानावरून राजकारण्याच्या आखाड्यात दिसणार आहे.