Pune News: पुण्यात काँग्रेसला आणखी एक झटका; सोनाली मारणे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम

पुण्यातून काँग्रेसचे आमदार राहीलेले आणि नंतर लोकसभा निवडणूक लढवलेले रविंद्र धंगेकर यांनी ही काँग्रेसची साथ सोडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

काँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचं चिन्ह आहे. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठविल्याचे समजत आहे. मारणे या सध्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर कार्यरत होत्या. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हर्षवर्धन सपकाळ यांना लिहिलेल्या पत्रात सोनाली मारणे यांनी म्हटले आहे की,  2011 पासून काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून मी काम करत आहे. ज्याप्रमाणे विरोधी पक्ष म्हणून काम पक्षाने करायला हवा त्याप्रमाणे पक्ष काम करताना दिसत नाही. याची खंत वाटते. जे काम करू शकतात त्यांना योग्य न्याय दिला जात नाही. असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. त्यातून त्यांनी एक प्रकार पक्ष नेतृत्वालाही लक्ष केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: टार्गेट अहमदाबाद, उद्देश दहशतवाद? 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही?

पुढे त्या म्हणतात, तसेच निवडणूक आकडेवारी पेक्षा कार्यकर्त्यांच्या भावनांकडे लक्ष देण्यात पक्षाला अपयश आले आहे.  राष्ट्रीय कार्यकारणी कडून महाराष्ट्राला कायमच दुय्यम दर्जा दिला जात आहे. पक्षाकडे पुढील पंचवार्षिकसाठी कोणतीही योजना नाही. असेही मारणे यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसचा अंतर्गतवाद या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही दिवसात पुण्याची काही काँग्रेस नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Plane crash News: नेपाळची मुलगी, बिहारमध्ये शिकली, विमान कंपनीत कमाला लागली, पण पुढे भयंकर शेवट

पुण्यातून काँग्रेसचे आमदार राहीलेले आणि नंतर लोकसभा निवडणूक लढवलेले रविंद्र धंगेकर यांनी ही काँग्रेसची साथ सोडली. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्याच्या पाठोपाठ अन्य काही पदाधिकारीही काँग्रेसमधून बाहेर पडले. भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी ही पक्षाची साथ सोडली. त्यामुळे पुणे आणि पुणे जिल्ह्यात काँग्रेसला एक प्रकार उतरती कळा लागल्याचे दिसत आहे. त्यात आता मारणे यांनी ही राजीनामा दिला आहे. 

Advertisement