विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसाला अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. 20 नोव्हेंबर, बुधवारी राज्यभरात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे शेवटच्या काही दिवसात प्रचाराचा जोर वाढला आहे. शिवाजी पार्कात भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवाजी पार्कातील मैदानासाठी उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंकडूनही प्रयत्न सुरू होते. 17 नोव्हेंबर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कात कुणाची सभा होणार, यावरून मनसे आणि ठाकरे गटात चढाओढ होती. परंतु मुंबई महापालिकेने अगोदर अर्ज केलेल्या मनसेला शिवाजी पार्क मैदान दिल्याची माहिती असून आज दुपारी लेखी परवानगी दिली जाणार आहे.
नक्की वाचा - '...म्हणून धारावी विकासाला उद्धव ठाकरेंचा विरोध', राज ठाकरेंनी सांगितलं आर्थिक राजकारण
त्यामुळे 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कात मनसेचाच आवाज घुमणार तर 17 नोव्हेंबरला शिवसेना ठाकरे गटाची बीकेसीत सभा होणार आहे. शिवाजी पार्कात राज ठाकरेंचा तर बीकेसीत उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार आहे. शिवाजी पार्कात कुणाची सभा होणार, यावरून मनसे आणि ठाकरे गटात चढाओढ लागली होती. परंतु मुंबई महापालिकेने अगोदर अर्ज केलेल्या मनसेला शिवाजी पार्क मैदान दिल्याची माहिती असून आज दुपारी लेखी परवानगी दिली जाणारा आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्यामुळं ठाकरे गटाने अखेर 17 नोव्हेंबरची मुंबईतील शेवटची सभा बीकेसीच्या मैदानावर घ्यायचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमातही बीकेसीतील सभेचा उल्लेख आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन असल्याने शिवाजी पार्कच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी होवून त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद होवू शकतो. त्यामुळं मैदान आपल्याला द्यावे असे पत्र ठाकरे गटाने पालिकेला दिले होते. परंतु पालिकेने मनसेला शिवाजी पार्क मैदान देण्याचा निर्णय घेतला आहे.