जाहिरात

'...म्हणून धारावी विकासाला उद्धव ठाकरेंचा विरोध', राज ठाकरेंनी सांगितलं आर्थिक राजकारण

निवडणूक आयोगाला समजलं  पाहिजे ज्याच्या हातातून पैसे सुटत नाहीत त्याच्या बॅगेत कुठून येणार?' असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली.

'...म्हणून धारावी विकासाला उद्धव ठाकरेंचा विरोध', राज ठाकरेंनी सांगितलं आर्थिक राजकारण

वरळी: 'निवडणूक आता शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचली आहे. सगळ्यांची रोजची नाटक बघतोय. काही जणांची रडू बाई रडू शो सुरु आहेत, मला का तपासलं? हेलिकॉप्टरमधून बॅग काढून तपासलं. तपासलं तर तपासलं. मला पण तपासलं. फक्त निवडणूक आयोगाला समजलं  पाहिजे ज्याच्या हातातून पैसे सुटत नाहीत त्याच्या बॅगेत कुठून येणार?' असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. वरळीमध्ये मनसेचे उमेदवार संदिप देशपांडे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे? 

'मला सगळ्यांचा एक प्रश्न असतो. वरळीमध्ये तुम्ही उमेदवार दिला नव्हता पण तुमचा मुलगा उभा आहे तर सगळ्यांनी उमेदवार दिला. दिला असेल प्रत्येकाचा एक विचार असतो. प्रत्येकाकडे उदार विचार नसतो. कोणी उमेदवार दिला किंवा नाही दिला आपल्याला काय फरक पडतो. मला प्रश्न विचारतात तुम्ही भूमिका बदलली. आज सगळ्यांच्या साक्षीने सांगून टाकतो, २०१९ च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या स्वार्थासाठी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दावणीला बांधली त्याला भूमिका बदलणे म्हणतात', असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. 

नक्की वाचा: 'गद्दारी केली, आता सुट्टी नाही', दिलीप वळसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवार गरजले!

स्वार्थासाठी भूमिका बदलंत नाही...

'मी स्वतःच्या स्वार्थासाठी भूमिका बदलली नाही.2014 च्या आधी देशामधील पहिला माणूस मी होतो ज्याने सांगितलं मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हावेत.मात्र सरकार आल्यानंतर सगळ्या गोष्टी विरोधातल्याच करण्यात आल्या. त्याच योजना, महागाई वाढली, म्हणून मी विरोध करत होतो. 2019 च्या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी अशा झाल्या ज्या योग्य झाल्या,  चांगल्या झाल्या. जसे काश्मीरमधील 370 कलम हटवले.अनेक कारसेवकांच्या आत्म्याला राममंदिर बांधण्याने शांती मिळाली. मग अभिनंदन करायंच नाही का?' असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

'धारावी'वरुन उद्धव ठाकरेंवर आरोप

'कोकणात अणुऊर्जा प्रकल्प येणार होता तेंव्हा उद्धव ठाकरेनी विरोध केला होता. त्यांना माहिती पाहिजे, सर्वात जास्त गर्दी असणाऱ्या मुंबई शहरात भाभा अटॉमिक रिसर्च सेंटर आहे ते मध्यभागी आहे. त्यात न्यूक्लियर रिसर्च सेंटर आहे. मुंबईच्या मध्यभागी इतक्या वर्षापासून असणाऱ्या या प्रकल्पाचा कधीही फटका मुंबईला बसला नाही. मग कोकणात होणाऱ्या अणुउर्जा प्रकल्पाला विरोध करायला कोणत्या उद्योगपतीनी सांगितले होते. विरोध करतात म्हणजे कोणतातरी उद्योगपती मागे असतोच. ज्यांच्या ते लग्नाला जातात. हे विरोध करण सहज होत नाही त्यामागे वेगळा उद्देश असतो. आर्थिक गणित असतात. आज धारावीच्या विकासाला उद्धव ठाकरे विरोध करतायत यामागेही आर्थिक राजकारण आहे, असा गंभीर आरोपही राज ठाकरे यांनी यावेळी केला. 

महत्वाची बातमी: मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाची निवडणुकीसाठी भूमिका जाहीर, ठाकरेंची अडचण वाढणार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com