विधानसभा निवडणुकीसाठीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. आता या निमित्ताने शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात चांगलेच वाकयुद्ध रंगले आहे. खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना डिवचत ते महाराष्ट्राचा द्वेश करणाऱ्यां बरोबर आहेत अशी टिका केली होती. त्याला आता मनसेने प्रत्युत्तर देत संयुक्त महाराष्ट्राला ज्यांनी विरोध केला ते तुम्हाल कसे चालतात, हेच का तुमचे महाराष्ट्र प्रेम? असा प्रश्न मनसेने केला आहे. त्यामुळे आगामी काळात हे वाकयुद्ध आणखी रंगण्याची शक्यता आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संजय राऊत यांची टिका काय?
मनसे प्रमुख राज ठाकरे हे सध्या नक्की कोणा सोबत आहेत अशी विचारणा संजय राऊत यांनी केली होती. ते नेहमी आपली भूमिका बदलत असतात. त्यांची एक अशी भूमिका नाही. त्यामुळे त्यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही असे राऊत म्हणाले. ते नेहमी महाराष्ट्राचा द्वेश करणाऱ्या मोदी आणि शहांना साथ देतात. महाराष्ट्राचा द्वेश करणाऱ्यांना राज ठाकरे साथ देतात. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्र आणि मराठी प्रेमा बद्दलच राऊत यांनी राज ठाकरे यांना घेरलं. शिवाय त्यांच्यावर कुरघोडी करत त्यांची भूमिका नेमकी काय असा प्रश्नही त्यांना केला.
ट्रेंडिंग बातमी - मोठी बातमी! मविआचं जागा वाटप ठरलं, मुंबईतल्या 99 टक्के जागांवर सहमती
मनसे विरूद्ध उबाठा वाद पेटला
संजय राऊत यांनी महाराष्ट्र प्रेमाबाबत केलेले वक्तव्य मनसेच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. मनसेने त्याला तातडीने उत्तर दिले आहे. मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्वीट करत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. ट्वीटमध्ये ते म्हणतात 'चोमडे राऊत आणि त्यांचे पक्ष प्रमुख नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बरोबर राज्यात आणि दिल्ली सरकारमध्ये वाटेकरी होते. त्यावेळी ते महाराष्ट्राचे दुश्मन नव्हते. मात्र आम्ही पाठिंबा दिला तरी दुश्मन ! काय लॉजिक आहे ? पुढे ते असे म्हणतात, ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला आणि १०६ हुतात्म्यांना ठार मारले, त्या काँग्रेस बरोबर जाणे म्हणजे महाराष्ट्र प्रेम का ? असा प्रश्न त्यांनी संजय राऊत यांना केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - लखपती दीदींसाठी मोदी आज जळगावात, एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबाबत अखेर पूर्णविराम!
'सर्व काही मुख्यमंत्रिपदासाठी'
संजय राऊत हे सर्व का करत आहेत हे लपलेले नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे. त्यासाठी ते दिल्लीत नतमस्तकही झाले आहे. पण त्यांना अजूनही सिग्नल मिळालेला नाही. त्यामुळेच संजय राऊत हे नैराश्यात आहेत. त्याच बरोबर त्यांचे पक्ष प्रमुख हे कोमात आहेत अशी टिकाही काळे यांनी केली आहे. दरम्यान हे वाकयुद्ध आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. संजय राऊत यांनी राज यांना थेट लक्ष्य केल्याने हा वाद वाढू शकतो. शिवाय राज यांना गांभिर्याने घेण्याची गरज नाही असेही म्हटले होते.