पेपर लीक प्रकरणात Gen-Z रस्त्यावर उतरले आणि चमत्कार झाला. केद्रीय शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना शेवटी राजीनामा द्यावा लागला. या तरुणांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. या आंदोलनाच्या यशानंतर सगळकडे Gen-Z ची चर्चा सुरू आहे. तरुणांची ताकद काय आहे हे या आंदोलनाने जगाने पाहीले. या आंदोलनात Gen-Z तरुणांची मोठी भूमिका राहिली. जंतर-मंतरवरील आंदोलनाच्या यशानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मोठा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तूळात आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
हैदराबाद येथील कार्यक्रमात बोलताना रेवंत रेड्डी म्हणाले, “राहुल गांधी देशाचे पंतप्रधान झाल्यास ‘Gen-Z' मधील एका तरुणाला केंद्रीय शिक्षणमंत्री बनवले जाईल. यासाठी मी ‘इंडिया' आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करेन. अशी स्पष्ट भूमीकाच रेड्डी यांनी यावेळी मांडली. निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याची मागणी ही त्यांनी या निमित्ताने केली आहे. रेवंत रेड्डी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवण्याचे किमान वय 25 वरून 21 वर्षे करण्याची मागणी केली आहे. यासाठी तेलंगणा विधानसभेत लवकरच विशेष प्रस्ताव संमत करून केंद्राकडे पाठवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
नीट पेपर लीकविरोधातील कँडल मार्च हैदराबादमध्ये आयोजत करण्यात आला होता. यात मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सहभागी झाले होते. तरुणांच्या आंदोलनाने 56 इंचाच्या छातीचा अहंकार मोडून काढला आहे असं ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क आणि अनेक नेते उपस्थित होते. काँग्रेस संपूर्ण तेलंगणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिण रस्त्यावर उतरली होती. त्यात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विजय रॅली ही काढली गेली.
धर्मेंद्र प्रधान यांना अखेर पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यांचा पदभार आता प्रल्हाद जोशी यांना देण्यात आला आहे. प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी लोकसभा आणि राज्यसभेची कामकाज ही होवू शकले नव्हते. आधी राजीनामा मग चर्चा अशी भूमीका काँग्रेसने आणि विरोधी पक्षाने दोन्ही सभागृहात घेतली होती. यामुळे सरकार समोर पेच निर्माण झाला होता. आता ही कोंडी फुटली आहे. त्यामुळे सोमवारी लोकसभेचे कामकाज सुरळीत पार पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.