गेली 12 वर्ष देशाची फसवणूक झाली आहे. जनतेने चांगल्या गोष्टीसाठी मतदान केले होते. पण देशाला फक्त प्रलोभने दाखवली गेल. सर्व सामान्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. अशा वेळी जनतेच्या रूपाने विष्णूने आवतार घेतला आहे असं मत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. ते म्हणावे विष्णूने रुप घेतलं हे मी पाहीलं आहे. देश, धर्म वाचवण्यासाठी रस्त्यावर हा तरूण उतरला आहे. हा विष्णू आहे. असं ही ते म्हणाले. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या रोखठोक मुलाखतीत ठाकरे बोल होते. या मुलाखतीत ते दिल्लीतील आंदोलन, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि राम मंदिरात झालेली लुट याबाबत परखड मत व्यक केलं आहे.
दिल्लीतील आंदोलनावर ठाकरे थेट बोलले. ते म्हणाले हा उद्रेक निट पेपर फुटी पुरता मर्यादीत नाही. गेल्या 10 ते 12 वर्षात केंद्र सरकारने जी फसवणूक केली, त्याच्या विरोधातला हा असंतोष आहे. सर्व जनता आता भितीच्या पलिकडे गेली आहे. भितीची बंदूक सरकारने रोखली होती. पण आता जिवाची पर्वा न करता तरुण रस्त्यावर उतरले आहे. 2014 पासून ज्यांना पाठिंबा दिला त्यांनी पाठीत वार केल्याची जनतेची भावना आहे असं ठाकरे म्हणाले. आज देशात रोजगार नाही, महागाई वाढली आहे, पेट्रोलमध्ये भेसळ होत आहे, पक्ष फोडले जात आहेत, राम मंदिर लुटले, पेपर फुटले पण सरकारला कशाचे काहीच पडले नाही. ज्यांना व्यवस्था चालवता येत नाही त्यांच्या हातात हे सरकार आहे अशी टीका ही ठाकरे यांनी केली.
आंदोलनात भाग घेतलेल्या तरुणांना मारहाण झाली. तरुणींचे कपडे फाडले गेले. त्यांचे व्हिडीओ पाहण्याची वेळ न्यायधिशांना नाही. ते नक्की कोण आहेत असा संतप्त सवाल ही ठाकरे यांनी उपस्थित केला. मुलांना- मुलींना मारलं जातं. त्यांचे कपडे फाडले जातात त्यावर कोर्ट काही करत नाही. मुलं रस्त्यावर का उतरली? त्यांना परिक्षेला जायचं होतं, असं असताना ते रस्त्यावर आले याचा विचार सरकारने करायला हवा होता. पण तो केला नाही. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. यात काही लोक घुसले होते. काहींनी पोलिसांसारखे कपडे घातले होते. सिव्हीलमध्ये हातात पोलिसी दांडके घेवून कोण होते त्याची उत्तर मिळाली पाहीजे. त्यांना सोडता कामा नये.याला जबाबदार केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आहेत असं ही ते म्हणाले.
सिव्हील ट्रेसमध्ये आंदोलनात घुसलेले लोक संघाचे की भाजपचे होते. की ते पाकिस्तानातून आले होते असा प्रश्न ही ठाकरे यांनी केला. हे गुंड कोण होते त्यांना अटक करा. गृहमंत्री अमित शहा या हिंसाचाराला जबाबदार आहे. जर धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांचा राजीनामा घेतला आहे तर अमित शहा यांचा ही राजीनामा घेतला पाहीजे असं त्यांनी स्पष्ट केलं. राम मंदिरातील दोन चोरूवरून ही त्यांनी भाजपला घेतलं. रामाच्या आडून भाजपची पापं सुरू आहेत. राम मंदिरातील दान पेटी नेहरूंनी लुटली का असा प्रश्न ठाकरे यांनी केला आहे. दान पेटीतून लुटलेल्या पैशातून आमदार खासदार खेरदी केले जात आहेत का अशी विचारणा ही त्यांनी या निमित्ताने केली.
तरुणांना रस्त्यावर उतरावे लागले. मंत्र्याचा राजीमाना घ्यावा लागला. हे सर्व विरोधी पक्षांचे अपयश आहे असं ही ठाकरे म्हणाले. देशाच्या जनतेचा राजकारण्यांवरचा विश्वास उडाला आहे. पण तरुणांची हिंमत पाहून वाटलं देश जिवंत आहे. ही हिंमत जिवंत आहे तोपर्यंत देशात हुकूमशाही येणार नाही. ज्यांची लायकी नाही असे लोक खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे अशा सर्वांचाच राजीनामा घेण्याची गरज आहे. शहा यांनी तर निवडणूका जिंकण्यासाठी बंगालमध्ये सैन्य घुसवले. ते त्यांनी पीओके मध्ये किंवा मणिपूरमध्ये पाठवायला हवे होते. पण त्यांनी सैन्याचा वापर करून बंगालच्या निवडणुकी जिंकल्या. याचाही राग जनतेच्या मनात असल्याचं ठाकरे म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world