रोहित पवार धमाका करणार? सरकार विरोधातलं मोठं प्रकरण हाताला लागल्याचा दावा

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशमुळे महाविकास आघाडी फ्रंटफूटवर आहे. अशा स्थितीत महायुती सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडायची नाही अशी रणनितीच मविआची आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

विधीमंडळाचे अधिवेशन आज गुरूवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशमुळे महाविकास आघाडी फ्रंटफूटवर आहे. अशा स्थितीत महायुती सरकारची कोंडी करण्याची एकही संधी सोडायची नाही अशी रणनितीच मविआची आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. सरकार विरोधातले एक मोठे प्रकरण आपल्या हाती लागले असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबतचा खुलासा ते पत्रकार परिषदेतून करणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

रोहित पवारांच्या हाती कोणते प्रकरण? 

रोहित पवार यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हे सरकार दलालीमध्ये अडकले असल्याचा मोठा आरोप त्यांनी केला आहे. ज्या गोष्टीतून या सरकारला दलाली मिळते त्यात त्यांना जास्त इंट्रेस्ट आहे. याबाबत आपल्याकडे काही पुरावे आले आहे. त्याबाबतचा खुलासा आपण पत्रकार परिषदेत करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. ही पत्रकार परिषद ते आज संध्याकाळी साडेपाच वाजता घेणार आहेत. सरकार कशा पद्धतीने दलाली घेते? त्यांची किती दलाली ठरली आहे? कुठे कुठे दलाली घेतली जाते? त्यात कोण आघाडीवर आहे? याबाबतचे खुलासे ते करतील. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धमाका होण्याची दाट शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - तुमच्या आमदाराचा पगार किती? भत्ते किती मिळतात? ही बातमी नक्की वाचा

महायुती सरकारवर केली टिका 

मुलींच्या शिक्षणाबाबत सरकार जर चांगली योजना आणत असेल तर त्याचे स्वागत करू असे रोहित पवार म्हणाले. पण या सरकारला शिक्षण, शेती, युवा, महिला यांच्या धोरणाचे काही पडलेले नाही. त्यांना यातून कोणतीही दलाली मिळत नाही. त्यामुळे ते या विभागाकडे जास्त लक्ष देत नाहीत असा आरोप रोहित पवार यांनी केला. हे सरकार कमिशन घेण्यात गुंतले आहे. त्यांनी हे बंद केले तर शिक्षण विभागासाठी तरी पैसे उपलब्ध होती असे पवार म्हणाले. 

भाजपचा डाव काय? 

भाजपची भूमीकाही खोटं बोल पण रेटून बोल अशीच आहे. सध्या ते अजित पवारांच्या मागे लागले आहेत. त्यांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न भाजपकडूनच केला जात आहे असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. मुलींसाठी शिक्षणाबाबत एक योजना आणली जात आहे. त्याला मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. त्याला अजित पवारांनी विरोध केल्याची बातमी बाहेर आली होती. त्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते. एका बैठकीतली बातमी बाहेर येतेच कशी असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत त्या मागे भाजप असल्याचे सांगितले. 

Advertisement

ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त पण खतांसाठी वणवण 

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहीलेली नाही. निवडणुकांमध्ये गुंडांचा वापर झाला. याच गुंडांना अगदी मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वच जण भेटत होते. त्यांना कसलीही भीती राहीलेली नाही. राज्यात ड्रग्जचा पुरवठा जबरदस्त सुरू आहे. पण खतासाठी शेतकऱ्यांना वणवण करावी लागते. ही खंत आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले. विधीमंडळाचे अधिवेश आज पासून सुरू झाले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.