राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या प्रतिनिधी सभेचं आयोजन बंगळूरुत करण्यात आलं आहे. त्याचा आज रविवार हा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांना हात घातला. औरंगजेबा पासून ते अगदी बांगलादेशात होत असलेल्या हिंदू वरील हल्ला पर्यंत त्यांनी संघाची भूमिका ही स्पष्ट केली. शिवाय संघ राजकारण नाही तर समाजासाठी काम करतो असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आक्रमणकारी मानसिकतेचे लोक भारतासाठी धोका आहेत असं वक्तव्य RSS चे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी केलं. अशा बाहेरच्या आक्रणकाऱ्यांचे तुस्ती करणाऱ्या लोकांकडे त्यांचे बोट होते. औरंगजेबाबाबतही त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. औरंगजेब हा भारताचा नायक कधीच होवू शकत नाही. त्यामुळे आपल्याला विचार करण्याची गजर आहे की जे बाहेरून भारतात जे आक्रमणकारी आले ते आपले आदर्श आहेत की स्थानिक लोक नायक आहे, असं होसबळे यावेळी म्हणाले.
वक्फ बोर्ड संशोधन विधेयकावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. या विधेयकाचे समर्थन करताना त्यांनी हे लोकांच्या हिताचे असल्याचे सांगितले. सध्या मतदार संघ पुनर्रचनेला दक्षिणेतील राज्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. त्यावरही त्यांनी संघाची भूमिका स्पष्ट केली. दक्षिणेतील जागांवर कुठलाही परिणाम होता कामा नये. त्यातून प्रादेशिक समतोल राखला गेला पाहीजे असंही ते म्हणाले. अयोध्येत बनलेले राम मंदीर हे आरएसएसमुळे नाही तर ती समाजाची एक देण आहे असं ही त्यांनी या निमित्ताने स्पष्ट केलं.
कर्नाटकात भाजपचे सरकार असताना मंत्र्यांचे स्विय सहाय्यक हे संघाचे पदाधिकारी होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी सांगितले की संघाने कधी ही कुठल्याही गोष्टीसाठी दबाव टाकलेला नाही. संघाचे काम हे समाजाला संघठीत करण्याचे आहे. राजकारणात हस्तक्षेप करण्याची भूमिका कधीही संघाची राहीली नाही असं ही त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या हल्ल्याचा ही निषेध केला. शिवाय त्या विरोधातला प्रस्तावही मंजूर केला. हिंदू वर होत असलेले हे हल्ले सुनियोजित असल्याचं ते म्हणाले. शिवाय सर्व हिंदूनीं त्याच्या मागे उभे राहीले पाहीजे असं ही स्पष्ट केलं. आरएसएसच्या प्रतिनिधी सभेने बांगलादेशातील हिंदू बरोबर एकसाथ त्यांच्या मागे उभे राहाण्याचे आवाहन केले आहे.