जाहिरात

Sanjay Raut rokhthok : 'नागपूर हिंसाचार फडणवीसांच्या बदनामीसाठी', संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या आपल्या सदरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. 

Sanjay Raut rokhthok : 'नागपूर हिंसाचार फडणवीसांच्या बदनामीसाठी', संजय राऊतांच्या विधानाने खळबळ

Sanjay Raut rokhthok : संतोष देशमुख हत्या प्रकरण असो वा बीडमधील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये महाराष्ट्रातील गृहखात्य शून्य ठरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच नागपूर हिंसाचाराच्या घटनेने तर महाराष्ट्र सरकार सपशेल फेल ठरल्याचा आरोप केला जात असताना उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी 'सामना'तील रोखठोक या आपल्या सदरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संजय राऊतांनी आपल्या रोखठोकमधून नागपूर हिंसाचारामध्ये मुख्यमंत्र्यांचा संबंध असू शकत नसल्याचं म्हटलं आहे. ते लिहितात, राज्यकर्तेच दंगली घडवतात हे खरे, पण त्या राज्यकर्त्याला आपल्या मतदारसंघात किंवा आसपास दंगली नको असतात. त्यामुळे नागपुरच्या दंगलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे हे मानायला मी तयार नाही. मुख्यमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात हे सर्व घडले. त्यामुळे फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी किंवा अडचणीत आणण्यासाठी नागपूरची युद्धभूमी केली काय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. 

Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी,  कब्रस्तानात सुपुर्द-ए-खाकवेळी काय घडलं?

नक्की वाचा - Nagpur violence : नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी,  कब्रस्तानात सुपुर्द-ए-खाकवेळी काय घडलं?

नागपूर हिंसाचाराच्या घटनेसाठी त्यांनी दिल्लीकडे इशारा केला आहे. देशातील एक प्रख्यात सिनेकुटुंब आपल्या मुलाचं नाव तैमूर ठेवते आणि आपले पंतप्रधान त्या तैमुरचं कौतुक करतात. ते सर्व औरंगजेब खात्याचे लोक सहन करतात असंही राऊतांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. ते पुढे म्हणतात गुजरातच्या दाहोदमध्ये 3 नोव्हेंबर 1618 रोजी औंरगजेबाचा जन्म झाला. तो दिल्लीत गेला आणि दिल्लीतून महाराष्ट्र काबीज करायला निघाला आणि महाराष्ट्रातच कबरीत गेला. औरंगजेबाच्या अनेक बेगम होत्या, पण हिराबाईवर त्याचे प्रेम होते. तीसुद्धी गुजरातचीच. आता दिल्लीत गुजराती राज्यकर्त्यांची सत्ता आहे आणि त्याच राज्यकर्त्यांच्या समर्थकांना महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर उखडायची आहे. याच समर्थकांनी गांधी हत्यारा गोडसेचा गौरव केला आणि त्यांना हिटलरही प्रिय आहे. महाराष्ट्रात असे विष पसरवून नवहिंदुत्ववाद्यांना देशात अराजक माजवायचे आहे, असंही त्यांनी रोखठोकमध्ये लिहिलं आहे.