'देशमुख पीएमार्फत पैसे घ्यायचे', वाझेचा पुन्हा लेटर बॉम्ब, देशमुखांचाही पलटवार

सचिन वाझे हा सध्या जेलमध्ये आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी आखला होता. तसा आरोप करावा यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला होता असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला होता. या आरोपानंतर राज्याचे राजकारण ढवळले असताना सचिन वाझे याने लेटर बॉम्ब टाकला आहे. हे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहीले आहे. त्यात त्यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देशमुख हे आपल्या पीएमार्फत पैसे घ्यायचे. याचे पुरावे सीबीआयकडे आहेत. शिवाय आपण नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहोत असेही सचिन वाझे याने म्हटले आहे. यावर अनिल देशमुख यांनी ही पलटवार करत ही फडणवीसांची नवी चाल असल्याचे म्हटले आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

सचिन वाझे काय म्हणाले? 

सचिन वाझे हा सध्या जेलमध्ये आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे आपल्या पीएच्या माध्यमातून पैसे गोळा करत होते. याबाबतचे पुरावे सीबीआयकडे आहेत. आपणही काही पुरावे दिले आहे. शिवाय याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून कळवलेही आहे. या प्रकरणी आपण नार्को टेस्ट  करायलाही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय जे पत्र आपण लिहीले आहे त्यात जयंत पाटलांचेही नाव असल्याचे वाझे म्हणाले. यांच्या या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं

अनिल देशमुखांचा मोठा दावा    

सचिन वाझे याने केलेल्या आरोपनंतर अनिल देशमुख तातडीने माध्यमां समोर आले. देवेंद्र फडणवीसांवर आपण आरोप केले होते. त्यांनी ठाकरे पिता पुत्राला जेलमध्ये टाकण्याचा डाव आखला होता. या आरोपानंतर फडणवीस हादरून गेले. त्यानंतर त्यांनी आता नवी चाल आखली आहे असा पलटवार देशमुख यांनी केला. शिवाय सचिन वाझे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. त्याच्या कोणत्याही वक्तव्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तो त्या लायकीचा नाही असे ताशेर मुंबई उच्च न्यायालयाने मारले आहेत, याची आठवण फडणवीसांना यावेळी देशमुख यांनी करून दिली. त्यामुळे आताही त्याने काय वक्तव्य केली आहेत त्यावर विश्वास ठेवता येत नाही. वाझे आता जे काही बोलला आहे तो फडणवीसांचा प्लॅन असल्याचे ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  ...तर यशश्री वाचली असती? 'त्या' आदेशाकडे दुर्लक्ष करणं महागात पडलं

आरोपाने वातावरण तापलं 

दरम्यान वाझेच्या आरोपानंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. वाझेंची कसली नार्को करताय. भाजपच्या नेत्यांची नार्को टेस्ट करा. त्यानंतर त्यांनी काय कांड गेल्या दहा वर्षात केले आहेत ते समजेल. सत्ता जाणार आहे म्हणून असे आरोप वाढे कडून करून घेतले जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर या संपुर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहीजे अशी मागणी भाजपनेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तर हे पत्र आताच आणि फडणवीसांनाच का लिहीले गेले असा प्रश्न शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.    

Advertisement
Topics mentioned in this article