Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणात मराठा संघटना आक्रमक, अक्कलकोट बंदचा दिला इशारा

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना रविवारी (13 जुलै) घडली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
सोलापूर:

सौरभ वाघमारे, प्रतिनिधी 

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटमध्ये काळं फासण्यात आल्याची घटना रविवारी (13 जुलै) घडली होती. या प्रकरणात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास 18 जुलै रोजी अक्कलकोट बंदचा इशारा त्यांनी दिला. 

या प्रकरणातील आरोपी तीन दिवस अक्कलकोटला मुक्कामी होती. त्यांना मोक्का लावावा अशी मागणी या संघटनांनी केलीय. अक्कलकोट पोलिसांवर राजकीय दबाव होता, असा आरोप या संघटनांनी केला आहे. 

प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील सर्व व्हिडिओ आहेत. याबाबत उद्या (16 जुलै) अक्कलकोटमध्ये मराठा समाजाची बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : Jayant Patil : 'हीच योग्य वेळ आहे...' जयंत पाटील स्टेजवरच रडले! राष्ट्रवादीच्या बैठकीत जोरदार ड्रामा )
 

काय आहे प्रकरण?

अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी  शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी त्यांना काळं फासलं. प्रवीण गायकवाड यांनी त्यांच्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक झाले होते. त्यांनी याबाबत नाराजी ही व्यक्त केली होती.

Advertisement

त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. त्यामुळे त्यांनी गायकवाड हे शहरात आल्यानंतर त्यांच्यावर काळे टाकण्यात आले.  यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. 

शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे, किरण साळुंखे ,भैया ढाणे, कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी, भवानेश्वर शिरगिरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगावर शाई-वंगण टाकणे , धक्काबुक्की, हाताने मारहाण करणे तसेच वाहनाचं दगड मारून नुकसान केले असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले यांनी या मारहाणीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
 

Advertisement