Operation Sindoor: 'पंडित नेहरूंचे तुमच्यावर उपकार, सरदार पटेल असते तर...' राऊतांनी भाजपला आरसाच दाखवला

पंडीत नेहरू त्यांना निट झोपू ही देत नाहीत आणि निट जगू ही देत नाहीत, असं राऊत म्हणाले.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

ऑपरेश सिंदूरवर लोकसभे प्रमाणे राज्यसभेतही चर्चा सुरू आहे. याचर्चे वेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या छोटेखानी भाषणात भाजपला आरसा दाखवला. पहलगामध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 26  जणांची हत्या झाली. ती कशी झाली? हे सरकार अजूनही सांगू शकले नाही. संपूर्ण काश्मीर गृहमंत्र्यांच्या हातात आहे. कलम 370 हटल्यानंतर ते केंद्र शासीत करण्यात आले. तिथले पोलिस हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हाताखाली आले. तिथले पोलिस हे केंद्रीय  गृहमंत्र्यांचं ऐकते असं राऊत यावेळी म्हणाले. 

काश्मीरमध्ये आर्म फोर्स आहे.  तिथे उपराज्यपाल आहेत. ते ही मजबूत आहेत. तरीही पहलगामध्ये हल्ला झाला. त्यानंतर  त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. ते म्हणतात सुरक्षेत चूक झाली आहे. पण 26 लोक मारले गेले. चूक तर नक्कीच झाली आहे. सिंदूर उजाडलं आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार? राजीनामा कोण देणार? असा थेट सवाल राऊत यांनी राज्यसभेत सरकारलाकेला. पंडीत नेहरू राजीनामा देणार का? की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प राजीनामा देणार, जे डी वान्स राजीनामा देणार? असा चिमटाही त्यांनी यावेळी सरकारला काढणार. 

नक्की वाचा - Beed News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सूत्रधार, विशेष मकोका कोर्टाचं निरीक्षण

जर राजीनामा कुणी द्यायला पाहीजे तर तो  गृहमंत्र्यांनी दिला पाहीजे असं ते म्हणाले. जर 24 तासात उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो. कारण ते तुमचं ऐकत नाहीत.  तर मग 26 जणांचा जीव जातो. त्याची जबाबदारी घेवून राजीनामा दिला जात नाही. देशाची माफी मागितली जात नाही अशी विचारणी ही राऊत यांनी केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही टीका केली.   पंतप्रधान मोदी हे आपल्याला इश्वराचा आवतार मानतात. त्यांचे भक्त ही तेच मानतात. मोदी काय म्हणाले होते की मी वेळे अधी काही गोष्टी ओळखतो. यावरून राऊत यांनी फिरकी घेतली. 

नक्की वाचा - Kisan Samman Nidhi: PM-किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता कधी मिळणार? 'या' तारखेला थेट खात्यात जमा होणार

Advertisement

जर तुम्ही वेळे आधी काही गोष्टी ओळखता मग पहलगामध्ये दहशतवादी हल्ला होणार आहे हे तुम्ला कसं समजलं नाही. ते तुम्हाला कसं ओळखता आलं नाही असं राऊत यावेळी म्हणाले. इथं भाजपचे मंत्री खासदार मोठं मोठी भाषण करत आहेत. त्यांना सतत पंडीत नेहरूंची आठवण येते. पंडीत नेहरू त्यांना निट झोपू ही देत नाहीत आणि निट जगू ही देत नाहीत. पंडीत नेहरू हे महान होते. पण सरदार पटेलही पंतप्रधान व्हायला पाहीजे होते. ते एक लोहपुरूष होते. भाजपच्या खासदारांकडे पाहात ते म्हणाले पण तुमच्यावर पंडीत नेहरूंचे उपकार आहेत. तुम्ही त्यांचे आभार मानले पाहीजेत. 

नक्की वाचा - Al Qaeda: अल कायदाची ही आहे भारतातील मास्टरमाइंड, शमाचं काय आहे पाकिस्तान कनेक्शन

असं म्हणत राऊत म्हणाले सरदार पटेल यांनी आरएसएसवर बंदी आणली होती. ती बंदी पंडीत नेहरू यांच्यामुळे उठवण्यात आली होती. जर सरदार पटेल हे आणखी दहा वर्ष जगले असते तर तुम्हाला त्यांनी कधीच उखडून फेकलं असतं. आज तुम्ही इथे दिसला ही नसता असा हल्लाबोल संजय राऊत यांनी राज्यसभेत केला. तुम्हाला कुलभूषण जाधवला पाकिस्तानातून आणता आलं नाही. ते गेले कित्येक वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये खितपत पडले आहेत असं ही राऊत शेवटी आपल्या भाषणात म्हणाले. 

Advertisement