संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस हे भलतेच आक्रमक झालेत. त्यांनी पुण्या इथल्या आक्रोश सभेत धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यासह आणखी एका व्यक्तीचे नाव घेतले. ते नाव होते नितीन बिक्कड यांचे. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर धनंजय मुंडेंसह वाल्किक कराड आणि यात नितीन बिक्कड यांनी अवादा कंपनीकडे तीन कोटींची खंडणी मागितली होती असा आरोप धस यांनी केला होता. ही मिटींग या बिक्कड यांनी घडवून आणल्याचा दावाही धस यांनी केला होता. त्यानंतर हे नितीन बिक्कड हे कोण? याची चर्चा सुरू झाली. ते बिक्कड हे समोर आले असून त्यांनी धस यांचे दावे खोडून काढताना त्यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नितीन बिक्कड यांनी सुरेश धस यांनी केलेले एक एक आरोप खोडून काढले आहेत. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीची डिल करण्यासाठी कधीस गेलो नाही. किंवा अवादा कंपनीच्या तांबोळी या अधिकाऱ्यांनाही घेवून गेले नव्हतो. तांबोळी हे कधीही मुंबईला येत नाहीत. ते बीडची जबाबदारी सांभाळतात असं बिक्कड यांनी स्पष्ट केलं. शिवाय जी तारखी धस यांनी सांगितली आहे त्यावेळी मी मुंबईत नव्हतो असंही ते म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या बरोबर आधी एकाच पक्षात काम केलं आहे.त्यामुळे त्यांच्या बरोबर ओळख आहे. त्यांच्या भेटीही झाल्या आहेत. पण त्या आपल्या वैयक्तिक होत्या असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. खंडणी प्रकरणाशी आपला काही संबंध नाही असं ही त्यांनी सांगितलं.
त्याच बरोबर वाल्मिक कराड यांच्या बरोबर काही एक संबध नाही. त्यांच्या बरोबर ओळखही नाही. त्यांना कधी कोणत्या कार्यक्रमात पाहीलं असेल. पण गेल्या एक वर्षात त्यांच्या बरोबर कोणताही संबध आला नाही असं ही बिक्कड यांनी स्पष्ट केलं. शिवाय परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर कराड यांच्यासह कोणतीही बैठक केली नाही असंही ते म्हणाले. धस यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि खोटे असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे खंडणी प्रकरणात दोन्ही बंगल्यावर आपण कोणत्याही बैठकीत नव्हतो असं त्यांनी सांगितलं.
आपण काही कंपन्यांना सुरक्षारक्षक पुरवतो. हे सत्य आहे. आपली कंपनीही रजिस्टर कंपनी आहे. अवादा कंपनीचे कंत्राट ही आपल्याकडेच आहे. शिवाय या कंपनीला गाड्याही आपण पुरवतो. त्या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यां बरोबर बैठका होतात असं त्यांनी सांगितलं.जर आपण याच कंपनीकडे खंडणी मागितली असती तर आपलं कंत्राट त्यांनी कधीच रद्द केलं असतं. पण हे कंत्राट आजही आपल्याकडे असल्याचे बिक्कड याने स्पष्ट केले. ज्या वेळी अवादा कंपनीच्या बाहेर मारहाण झाली त्यावेळी सुदर्शन घुले याच्या विरोधात आपल्याच सुरक्षारक्षकाने तक्रार केली होती. त्यावेळी कंपनीला आपणच सहकार्य केल्याचा दावा बिक्कड याने केला. त्यावेळी वाल्मिक कराड यांने तक्रार मागे घ्यावी म्हणून फोन वैगरे केला नव्हता असंही त्यांनी सांगितलं.
आपल्यावर सुरेश धस यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहे. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत. केवळ वंजारी समाजाचे असल्यामुळे आपल्याला टार्गेट केले जात आहे असा आरोप यावेळी बिक्कड यांनी केला. मी फक्राबादचा सरपंच आहे. माझ्या जिल्हा परिषद मतदार संघात सर्वाधिक मराठा आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी तिथे पहिलं आंदोलन आपणच उभं केलं होतं असं बिक्कड म्हणाले. त्यावेळी माझ्या गावात मला निलेश घायवाटे याने धमकी दिली होती. हा गुंड प्रवृत्तीचा माणूस कोणाचा आहे? त्याला कोणाचे आशिर्वाद आहेत असा प्रश्न करत त्यांनी सुरेश धस यांच्याकडेच एक बोट केले आहे. त्यानंतर याच घायवाटे याच्या बरोबरचा सुरेश धस यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.