भारतात ह्यूमन मेटा न्यूमो व्हायरसचे (HMPV) दोन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभाग सावध झालं आहे. सध्या बंगळुरूत HMPV चे दोन रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी नियमावलीची अंमलबजावणी करणं आवश्यक आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
चीनमध्ये Human Metapneumovirus (HMPV) उद्रेकाच्या बातम्या येत आहेत. हा विषाणू तीव्र श्वसन संसर्गाचे प्रमुख कारण ठरत आहे. तो प्रथम 2001 मध्ये नेदरलँड्समध्ये आढळला होता. हा श्वसन संसर्ग मुख्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणे हिवाळा-उन्हाळ्यात होतो. महाराष्ट्रात सध्या तरी एचएमपीव्हीचा कोणताही रुग्ण आढळलेला नाही. मात्र आरोग्य विभागाकडून श्वसन संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीनमधील HMPV विषाणूसंदर्भात नाहक भीती न बाळगता आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन, आरोग्य सेवा संचालक डॉ. जितीन अंबाडेकर यांनी केलं आहे.
नक्की वाचा - HMPV Update : चीनमध्ये HMPV चा कहर, भारतात पहिला रुग्ण आढळल्याने चिंता वाढली; 8 महिन्यांच्या बाळाला लागण!
हे करा:
• खोकल्याच्या वेळी तोंड-नाक झाकावे.
• नियमितपणे हात धुवा.
• ताप-खोकला असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा.
• पोषणयुक्त आहार घ्या.
• घरातील हवा खेळती ठेवा.
हे करू नये:
• हस्तांदोलन.
• टिश्यू/रुमालाचा पुनर्वापर.
• आजारी लोकांशी संपर्क.
• डोळे-नाक-तोंड वारंवार स्पर्श करणे.
• सार्वजनिक ठिकाणी थुंकणे.
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेणे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world