चाट्या, गद्दार! काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अपक्ष आमदारावर नेटकऱ्यांनी केली टीका

देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Swearing in Ceremony) हे शपथ घेणार आहेत. 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये फडणवीसांसह उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही शपथ घेणार आहे. उर्वरीत मंत्र्यांचा शपथविधी सोहळा हा नंतर आयोजित केला जाणार आहे. गुरुवारी होत असलेल्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक प्रतिष्ठित  मंडळी उपस्थित राहणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होत असल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश आहे. काँग्रेसशी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या एका आमदारानेही फडणवीसांना शुभेच्छा दिल्या. यामुळे या आमदारावर महाविकास आघाडीचे समर्थक  टीका करू लागले आहेत. चाट्या, गद्दार असं म्हणत मविआ समर्थकांनी या आमदारावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस 5 तारखेलाच मुख्यमंत्रिपदाची शपथ का घेणार? ज्योतिषांनी सांगितलं महत्त्व

2023 मध्ये विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली होती. या निवडणुकीसाठी सत्यजीत तांबे हे इच्छुक होते. काँग्रेसने मात्र सत्यजीत यांना उमेदवारी न देता त्यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता आणि सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीतर्फे शुभांगी पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. सत्यजीत तांबे यांनी पाटील यांचा दणदणीत पराभव केला होता. या निवडणुकीत भाजपने सत्यजीत तांबे यांना मदत केल्याची कुजबुज त्यावेळी सुरू होती. देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या चांगल्या संबंधांमुळे सत्यजीत यांना भाजपने छुपी मदत केल्याचे बोलले जाते. सत्यजीत तांबे यांनी गुरुवारी एक ट्विट करत म्हटले की, "देवेंद्रजी फडणवीस यांची 2014 साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना मी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. 2014 ते 2024 या दशकात विविध भूमिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी त्यांनी घेतलेले निर्णय पाहता माझ्या शुभेच्छा योग्य ठरल्या याचा आनंद आहे."

Advertisement

सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे नेते सुधीर तांबे यांचे पुत्र असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे त्यांचे मामा लागतात. विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीदरम्यान घडलेल्या घडामोडींमुळे सत्यजीत तांबे हे दुखावले गेल्याचे सांगण्यात येते.

Advertisement

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाही सत्यजीत यांनी X वर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली होती. महाराष्ट्रातील कॉंग्रेस पक्षाची स्थिती पाहून मनाला खूप वेदना होत आहेत. ज्या संघटनेसाठी मी आयुष्याचे २२ वर्ष तन, मन, धनाने दिली, त्याची ही हालत पाहून अस्वस्थ झालोय, अशी प्रतिक्रिया तांबे यांनी दिली होती.