'राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला शरद पवारचं जबाबदार'

राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचारीकरण, जातीयवादकरण जर कोणी केले असेल तर ते शरद पवार यांनीच केले आहे, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

सागर कुलकर्णी 

देशातल्या भ्रष्ठाचाऱ्यांचे सेनापती हे शरद पवार आहेत, अशी जोरदार टिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती. त्याचीच री ओढत आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना लक्ष्य केले आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचारीकरण, जातीयवादकरण जर कोणी केले असेल तर ते शरद पवार यांनीच केले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. सदाभाऊ खोत यांनी आज रविवारी पदाची शपथ घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही जोरदार टिका केली. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवारांवर टिका 

शरद पवारांनी मराठा समाजासाठी काय केले असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. एकनाथ शिंदे यांनीही आरक्षण दिले. शरद पवारांनी महाविकास आघाडी बनवली. त्यावेळी मराठा समाजाला दिलेले आरक्षण गेले. याबाबत कोणी काही बोलत नाही. उलट देवेंद्र फडणवीस यांनाच ट्रोल केले जाते. शरद  पवारांनी आरक्षणा बाबत भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. मात्र ते मुख्यमंत्र्यांवर सर्व ढकलत आहेत असेही खोत म्हणाले. या पुढे जावून त्यांनी पवारांवर जहरी टिका केली आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भ्रष्टाचारीकरण, जातीयवादकरण हे शरद पवारांनीच केले आहे. त्याला तेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवाय या पुढच्या काळात ते थांबतील असं वाटत नाही असेही ते बोलले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  अजितदादांचा आणखी एक आमदार शरद पवारांच्या गळाला? तो आमदार कोण?

राजू शेट्टींना सुनावलं 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे नेते राजू शेट्टी यांना संधीचे सोनं करता आले नाही. शरद जोशींनंतर चळवळीत जर कोणाला मोठी संधी मिळाली असेल तर ती राजू शेट्टी यांनी मिळाली होती. त्यांना लोकं टिकवता आली नाही असेही खोत म्हणाले. शेट्टींना कोणी मोठं होणं हे असुरक्षित वाटतं. कोणी मोठं होवू नये असं त्यांना वाटतं. जे नेतृत्व त्यांनी निर्माण केलं होतं तेच त्यांना स्वत: हून घालवले. त्याचं त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हणाले. ज्या मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले तिथे त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ का आली याचीही विचार त्यांनी करावा. आपला त्यांच्या बरोबर कोणताही वाद नव्हता. त्यांनी मी आपला नेताच मानत होते. पण त्यांचे कान कोणीतरी भरले आणि आमची मैत्री तुटली असंही खोत यांनी सांगितले. शेट्टी यांची राजकारणातली विश्वासहर्ता संपली आहे असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - हाताची मेंदी जाण्याआधीच कपाळाचं कुंकू गेलं, संभाजीगनर ऑनर किलींगने हादरलं   

मनोज जरांगेंना ही सल्ला 

मराठा समाजाला जर कोणी आरक्षण दिले असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र ते फडणवीस असल्याने त्यांच्यावर टिका होते. ते तर देशमुख किंवा पवार असते तर सर्वांनी ढोल वाजवले असते असेही ते म्हणाले. आंदोलन सुरू केल्यानंतर ते कधी थांबवायचे हे समजले पाहीजे. जरांगे यांच्या आंदोलनानंतर सरकार त्यांच्या बरोबर चर्चेसाठी तयार आहे. कायतेतज्ज्ञ चर्चेला तयार आहेत. जरांगेंनी ओबीसीतून आरक्षण मिळणे शक्य आहे का याची चर्चा केली पाहीजे. सेगे सोयरेची अंमलबजावणी होणार की नाही याचीही चर्चा करावी असे खोत म्हणाले. पण तसे न करता भाजपचे उमेदवार पाडा ही कोणतही भाषा आहे. हा आंदोलनाच्या आडून नवा दहशतवाद जन्माला घालत आहात का अशी विचारणाही खोत यांनी यानिमित्ताने केली. 

Advertisement
Topics mentioned in this article