निवडणुकीनंतर पक्ष सोडण्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांचं उत्तर, म्हणाले....

Jayant Patil on Sunil Tatkare लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (राशप) आमदार काँग्रेसमध्ये जाणार, सुनील तटकरे यांनी केला होता.

Advertisement
Read Time: 2 mins
पक्ष सोडण्याच्या चर्चेवर जयंत पाटील यांनी उत्तर दिलंय.
मुंबई:

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (राशप) आमदार काँग्रेसमध्ये जाणार, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला होता. राशपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावर उत्तर दिलंय. आमच्या पक्षाचे आमदार सोनिया गांधी यांच्या संपर्कात आहेत ही माहिती तटकरे यांना कुणी दिली? आमचा कोणताही आमदार काँग्रेसच्या संपर्कात नाही, असं स्पष्टीकरण पाटील यांनी दिलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आठवलेंच्या ऑफरला उत्तर 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी जयंत पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये येण्याची ऑफर दिली होती. जयंत पाटील पक्षात आल्यास त्यांना प्रदेशाध्यक्ष करु असं आठवले यांनी जाहीर केलं होतं. त्या ऑफरलाही पाटील यांनी उत्तर दिलं. 'रामदास आठवले यांनी मला ऑफर दिली. ते आपुलकीनं बोलले असतील. मी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहे. मी इतर पक्षात कशाला जाऊ,' असं पाटील यांनी स्पष्ट केलं.

या लोकसभा निवडणुकीत आम्हाला 7 पेक्षा जास्त जागा मिळतील. तर महाविकास आघाडी राज्यात 30 ते 35 जागा मिळवेल अशी अपेक्षा असल्याचं पाटील यांनी सांगितलं. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर उद्धव ठाकरे बोलले होते.  मुंबईत मतदान संथ झालं त्यावर त्यांनी आक्षेप व्यक्त केले. यामध्ये चुकीचं काहीही नव्हतं, असं पाटील यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : उद्धव ठाकरेंना 'ती' पत्रकार परिषद भोवली, निवडणूक आयोगाचे कारवाईचे आदेश )
 

काय म्हणाले होते तटकरे ?

यापूर्वी सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांबाबत मोठा दावा केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांतील एक मोठा गट काँगेसमध्ये जायच्या तयारीत आहे. य. मागील काही दिवसांपासून या आमदारांकडून सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्षांतर्गत नाराजीतून हे आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा तटकरे यांनी केला होता. 

Advertisement