Sharad Pawar: अशोक खरातबाबतचा प्रश्न अन् शरद पवारांनी सांगितली आतली गोष्ट, सर्वांच्याच भुवया उंचावल्या

पण सध्या महाराष्ट्राचं चित्र बदललं आहे. महाराष्ट्रात बाबांची गर्दी झाली आहे असं पवार म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • अशोक खरातच्या कारवाया महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
  • शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अशोक खरातबाबत मोठं वक्तव्य केलं आहे
  • राजकारण्यांनी बाबांकडे जाणे आणि त्यांना प्रचार करणे यातील विसंगतीवर टीका केली आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
नवी दिल्ली:

अशोक खरातचे रोज एक-एक कारनामे समोर येत आहेत. त्याने केलेलं कांड हे राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे अनेक राजकारणी ही त्याच्या आहारी गेली होते हे समोर आले आहे. हे सर्वात धक्कादायक मानले जात आहे. राजकारण्यांसोबत उठबस ते त्यांना सल्ला देण्यापर्यंत अशोक खरात अग्रेसर होता. राजकारण्यांसोबत खरातचे असलेल्या या नात्यावर शरद पवारांनी आपल्या खास शैलीत ताशेरे ओढले आहे. शिवाय आतली गोष्ट सांगत राजकारण्यांचे कान पिळण्याचे ही काम केले आहे. त्यांना अशोक खरात बाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. 

राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर शरद पवारांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना अशोक खरातबाबत प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारला असता त्यांनी पत्रकारांनी प्रति प्रश्न केला. तुम्ही मला किती वर्षापासून ओळखतात असं म्हणत, मला कधी हातात गंडा, धागा, दोरा बांधताना तुम्ही पाहीलं आहे का? अशी विचारणा केली. मी काही ठिकाणी जातो. त्यात पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घेतो. तुळजापूरला भवानी मातेचं दर्शन घेता. कनेरीला मुळ गावी दर्शन घेतो. पण हे करत असताना कधी जाहीरात करत नाही असं शरद पवार म्हणाले. 

Advertisement

नक्की वाचा - Sharad Pawar: सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर अन् विषयच संपवला

पण सध्या महाराष्ट्राचं चित्र बदललं आहे. महाराष्ट्रात बाबांची गर्दी झाली आहे. या बाबांकडे आमच्यातलेच लोक जात असतात. एकीकडे शाहू, फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे बाबांच्या पाया जवळ जायचे हे चित्र चांगलं नाही असं ते म्हणाले. जे लोकप्रतिनिधी आहे ते सांगतात एक आणि करतात दुसरे. त्यामुळे त्यांची भूमीका ही विसंगत दिसते. लोकांना एक सांगायचे आणि बाबांकडे जायचे ही विसंगतीच म्हणावी लागेल अशा शब्दात राजकारणी आणि बुबाबाबांच्या संबंधावर शरद पवार थेट बोलले. हे नातं योग्य नसल्याचा शेरा ही त्यांनी लगावला. महाराष्ट्राला बाबांनी घेरलं आहे असं ही ते म्हणाले. 

नक्की वाचा - Sunetra Pawar: 'माझ दुःख तळघरात कोंडलं', सुनेत्रा पवारांचा कंठ दाठला, शरद पवारांचे नाव घेत मोठं आवाहन

अशोक खरात प्रकरण सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. यात खरातच्या संपर्कात अनेक नेते मंडळी होते. त्यांची नावे ही समोर आली आहेत. रुपाली चाकणकर यांना तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदासोबतच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. राजकारणीच खरातच्या आश्रयाला जात होते. त्यावर शरद पवारांनी टीका केली आहे. हे राजकारण्यांचे कृत्य योग्य नाही असं ही ते म्हणाले. सामाजीक जिवनात अशा गोष्टी टाळल्या पाहीजे असं ही त्यांनी या निमित्ताने सुचित केले. सध्या अशोक खरातची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. तर त्याचा मुलगा आणि पत्नी फरार आहेत. त्यांचा ही शोध घेतला जात आहे.