सुनिल दवंगे
Shiv Sena News: भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे यांचा सन्मान करावा. त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करावे. तसे भाजपने केले तर आम्हाला आनंद होईल अशी मागणी माजी मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. केसरकर हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात. त्यांनी केलेल्या या मागणीचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. शिवाय त्याला एक वेगळे महत्व ही प्राप्त झाले आहे. त्यांनी ज्या वेळी हे वक्तव्य केलं आहे ती वेळ ही महत्वाची आहे. त्यामुळे हे वक्तव्य त्यांनी जाणीवपूर्व केले आहे का अशी ही चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
दिल्लीत झालेल्या पेपर लीक प्रकरणातील आंदोलनामुळे सध्या केंद्रातील भाजप सरकार बॅकफूटवर असल्याचं बोललं जात आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे शिक्षण मंत्री असलेल्या धर्मेंद्र प्रधान यांना राजीमाना द्यावा लागला होता. एकदरीत अशा पद्धतीचे वातावरण असतानाच दीपक केसरकर यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की विधानसभेची निवडणूक आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढलो. त्यांनी एवढं मोठं सत्तांतर घडवून आणलं. त्यामुळे आता त्यांच्या योगदानाचा सन्मान कसा करायचा हे भाजपाने ठरवायचं आहे. सत्तांतर झालं त्यावेळी शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात आलं होतं याची आठवण ही केसरकर यांनी करून दिली.
त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूका या एकनाथ शिंदे यांच्याच नेतृ्त्वात झाल्या होत्या. या निवडणूक महायुतीने जिंकल्या. त्यामुळे भाजपाने आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून त्यांचा सन्मान केला पाहीजे असं ते म्हणाले. भाजपने असं केलं तर आम्हाला निश्चितच आनंद होईल, असं मत केसरकर यांनी व्यक्त केलं. गुरुपौर्णिमेनिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी ते शिर्डीत आले होते. त्यावेळी ते पत्रकारांसोबत बोलत होते. त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या काही महिन्यात अनेक वेळा शिंदे दिल्लीला गेले होते. त्यावेळी राज्यात नेतृत्व बदल होणार असा तर्क लावला जात होता. पण या फक्त चर्चाच राहिल्या.
त्यात आता केसरकर यांचे वक्तव्य आले आहे. यावेळी त्यांनी अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं आहे. त्यांनी कंना यांना सल्ला देत श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला आहे. पण त्यांनी शिंदे यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याची जास्त चर्चा होती. केसरकर हे शिवसेना शिंदे गटाचे महत्वाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याला विशेष महत्वा प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाते याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष लागले आहे.