3 hours ago
मुंबई:

Shiv Sena Dasara Melava 2025 Live Updates :  विजयादशमीच्या मुहूर्तावर आज उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा मुंबईत झाला. शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मेळावा झाला. त्यांनी या मेळाव्यात सत्तारुढ मोदी सरकार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं. हिंदुत्वाच्या मुद्यावर अंगावर येऊ नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या भाषणात दिला. 

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांना उत्तर दिलं. तसंच राज्य आणि केंद्र सरकारनं केलेल्या सुधारणा आणि मदतकार्याची माहिती सादर केली. 'तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या,' असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला.


या दोन्ही मेळाव्याचे प्रत्येक अपडेट तुम्हाला एकत्र इथं वाचता येतील. त्यासाठी हा लाईव्ह ब्लॉग शेवटपर्यंत वाचा. 

Oct 02, 2025 20:50 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : तर मुंबई 25 वर्ष मागं जाईल - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचा विजय होणं आवश्यक आहे. ग्रामपंचायतीपासून ते  महापालिकेपर्यंत सर्वत्र महायुतीचा भगवा फडकला पाहिजे. मुंबई महापालिकेत महायुती जिंकली नाही तर मुंबई 25 वर्ष मागं जाईल असा इशारा शिंदे यांनी दिला. 

स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा फडवणं हे एकच लक्ष्य आहे. सर्व मतभेद बाजूला ठेवा आणि कामाला लागा, अशी सूचना शिंदे यांनी कार्यकर्त्यांना केली. 

Oct 02, 2025 20:47 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : बाळासाहेबांचं स्वप्न हे मोदींनी पूर्ण केलं - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : अयोध्येत राम मंदिर उभारणं, जम्मू काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. तुम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणाऱ्यावर टीका करतात, असा टोला शिंदे यांनी लगावला. 

Oct 02, 2025 20:45 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : तुम्ही गटप्रमुख नाही तर कटप्रमुख - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : एकनाथ शिंदे यांनी या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 'तुम्ही गटप्रमुख नाही तर कटप्रमुख' आहात, अशी टीका त्यांनी केली. मुंबई महाराष्ट्रापासून कधीही तोडू देणार नाही, असंही शिंदे यांनी सांगितलं. 

Oct 02, 2025 20:38 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : 'तुमचा मेळावा पाकिस्तानात करा', शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : काही जण आम्हाला मेळवा सुरतमध्ये करा असं म्हणाले. सुरत भारतामध्येच आहे. पण, तुमचा मेळावा पाकिस्तानमध्ये घ्या. असिफ मुनीरला त्या मेळाव्यात बोलवा. तुमच्या वक्तव्याची पाकिस्तानमध्ये हेडलाईन होते. देशद्रोहाची भाषा बोलणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता. तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा हक्क नाही. तुमचं हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. 

Advertisement
Oct 02, 2025 20:34 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : महाबिघाडी सरकारच्या काळात एकही प्रकल्प झाला नसता - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : मी मुख्यमंत्री झाल्यावर सर्व प्रकल्पांवरील बंदी हटवली. नवी मुंबईतील विमानतळ सुरु होत आहे. मेट्रो 3 सुरु झाली. महाबिघाडी सरकार असतं तर यापैकी एकही प्रकल्प झालं नसतं असा दावा शिंदे यांनी केला. 

Oct 02, 2025 20:29 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : मुंबई महापालिकेत जमवालेली माया कुठे गेली? - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : आम्ही शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली. तुम्ही मुंबई महापालिकेत जमवलेली माया कुठे गेली, लंडनला गेली का? असा सवाल शिंदे यांनी कुणाचंही नाव न घेता विचारला. 

Advertisement
Oct 02, 2025 20:23 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : विरोधकांना आमचे फोटो दिसतात, काम नाही - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : दुष्काळग्रस्तांना आम्ही मदत केली. त्या मदतीवरचे आमचे फोटो विरोधकांना दिसले. पण काम नाही. फोटोग्राफरला फक्त फोटो दिसतात, असा टोला शिंदे यांनी लगावला. 

मदत करण्यासाठी दानत लागते. एकनाथ शिंदे यांचे दोन्ही हात देणारे आहेत. ही देना बँक आहे, लेना बँक नाही, असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.  

Oct 02, 2025 20:17 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : 'फेसबुक लाईव्ह करणारा मी नाही' शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : फेसबुक लाईव्ह करत वर्क फ्रॉम करणारा मी नाही, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टोला लगावला. व्हॅनिटी व्हॅन घेऊन दौरा करणारा मी नाही. जिथे संकट तिथे शिवसेना, मदतीचं धोरण हेच शिवसेनेचं धोरण, असं शिंदे यांनी सांगितलं. त्याचबरोबर शिंदे यांनी यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी केलेल्या मदतीचा व्हिडिओ देखील दाखवला. 

Advertisement
Oct 02, 2025 20:13 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates:  दसऱ्याच्या दिवशी राज्यातील शेतकरी संकटात आहे. त्याचं सावट या सणावर आहे. पण, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, त्यांना सर्व मदत पोहचवणार, असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं.

Oct 02, 2025 20:09 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates: बळीराजा संकटात, त्यांना हाथ द्या - शिंदे

Eknath Shinde Dasara Melava Live Updates: एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटाचा उल्लेख केला. बळीराजाला मदतीचा हात द्या, असं आवाहन त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलं. 'जिथे संकट तिथे शिवसेना', 'जिथे संकट तिथे तुमचा हा एकनाथ शिंदे धावून जाणारंच', असं शिंदे म्हणाले. 

Oct 02, 2025 20:05 (IST)

Eknath Shinde Dasara Melava Live Updates: एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु, वाचा प्रत्येक अपडेट

Eknath Shinde Dasara Melava Live Updates: मुंबईतील गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु आहे. या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरु झालं आहे. शिंदे यांच्या भाषणातील प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी हे पेज नियमित रिफ्रेश करा.

Oct 02, 2025 19:53 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News : हिंदुत्वाच्या मुद्यावर अंगावर येऊ नका, ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News : हिंदुत्वाच्या मुद्यावर अंगावर येऊ नका, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी या भाषणात दिला. आमच्या अंगावर आलात तर तुमचे टोप्या घातलेल्या फोटोचे प्रदर्शन लावू, असा इशारा ठाकरे यांनी दिला. 

Oct 02, 2025 19:48 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News : भाजपा न केलेल्या कामाचं श्रेय घेतंय - ठाकरे

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News : मुंबईमध्ये न केलेल्या विकासकामांचं श्रेय भाजपाकडून घेतलं जातंय अशी टीका ठाकरे यांनी केली. मुंबईतील कोस्टल रोड, वरळीतील बीडीडी चाळ, मुंबईतील नाईट लाईफ या आपल्या संकल्पना आहेत. असं ठाकरे यांनी सांगितलं. 

Oct 02, 2025 19:45 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News : भाजपाकडं मतं विकत घेण्यासाठी पैसे, शेतकऱ्यांसाठी नाही - ठाकरे

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News : बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये  मोदी सरकारनं जमा केले. पण, या सरकारकडं  राज्यातील शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, अशी टीका ठाकरे यांनी केली. 

Oct 02, 2025 19:40 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: मोहन भागवतांना हिंदुत्व सोडलं असं म्हणायची हिंमत आहे? - ठाकरे

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लीम नेत्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर त्यांच्या नेत्यांनी भागवत यांचं 'राष्ट्रपिता' म्हणून वर्णन केलं. असं ठाकरे यांनी सांगितलं. मुस्लीम नेत्यांना भेटणाऱ्या भागवतांनी हिंदुत्व सोडलं असं म्हणायची भाजपाची हिंमत आहे का? असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला. 

Oct 02, 2025 19:36 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: भाजपाकडून हिंदू- मुस्लीम वाद लावला जातोय - ठाकरे

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  भाजपाकडून हिंदू- मुस्लीम वाद लावला जातोय, असा आरोप ठाकरे यांनी केला. तुमची हिंंमत असेल तर पक्षाच्या झेंड्यातील हिरवा रंग काढा, असं आव्हान त्यांनी दिलं. 

Oct 02, 2025 19:33 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: आई-पत्नीच्या नावावर डान्सबार सुरु - ठाकरे

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: देवेंद्र फडणवीस सरकारमधील मंत्री पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही. आई आणि पत्नीच्या नावावर डान्सबार सुरु आहेत, मुख्यमंत्री त्यावर कारवाई करत नाहीत, अशी टीका त्यांनी केली. 

Oct 02, 2025 19:31 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: 'भाजपा म्हणजे अमिबा', ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: उद्धव ठाकरे यांनी सत्तारुढ भाजपावर जोरदार टीका केली. भाजपा म्हणजे अनियंत्रितपणे वाढणारा अमिबा आहे, अशी टीका त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मणिपूरच्या जनतेचं मन दिसलं नाही, असं ठाकरे म्हणाले. 

Oct 02, 2025 19:27 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: जनसुरक्षा कायद्याला विरोध - ठाकरे

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News:  उद्धव ठाकरे यांनी या भाषणात राज्य सरकारनं केलेल्या जनसुरक्षा कायद्याला विरोध केला. त्याचबरोबर लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारातील आरोपी सोनम वांगचूक यांना करण्यात आलेल्या अटकेच्या मुद्यावर त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. 

Oct 02, 2025 19:25 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या - ठाकरे

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. 

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत करा, अशी मागणी त्यांनी केली. 

Oct 02, 2025 19:21 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: 'जे पळवलं ते पितळ होत, सोनं माझ्याकडे'

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News:  उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच पक्षातील फुटीर नेत्यावर हल्ला चढवला.  'जे पळवलं ते पितळ होत, सोनं माझ्याकडे' आहे, असं ठाकरे म्हणाले. 

Oct 02, 2025 19:17 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरु

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News:  मुंबईतील शिवाजी पार्कात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा सुरु झाला आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरु झाले आहे. सर्व अपडेट वाचण्यासाठी हे पेज नियमित रिफ्रेश करा. 

Oct 02, 2025 19:10 (IST)

Uddhav Thackeray UBT Dasara Melava Live News: उद्धव ठाकरे स्टेजवर आगमन, थोड्याच वेळात करणार भाषण

मुंबईतील शिवाजी पार्कात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा सुरु झाला आहे. या मेळाव्यात पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं सभेच्यास्थळी आगमन झालं आहे. ठाकरे थोड्याचवेळात या सभेत भाषण करणार आहेत. 

Oct 02, 2025 19:03 (IST)

Shiv Sena Dasara Melava 2025 Live Updates : दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता शिंदेच्या गटात

Shiv Sena Dasara Melava 2025 Live Updates : आज होणाऱ्या दसरा मेळ्यात उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचवेळी त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसलाय.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कोकणातील ज्येष्ठ नेते राजन तेली हे शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.